छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?
1857च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर भारताच्या पश्चिमेस आणि दक्षिणेकडील प्रांतांमध्ये सामाजिक बदलांचे वारे सुरू झाले. नवे शिक्षण, नवे विचार यामुळे पश्चिम भारतामध्ये विशेषतः तेव्हाच्या मुंबई प्रांतातील लोकांनी इतर भारतापेक्षा विविध क्षेत्रांत आघाडी घेतली.
यात इंग्रजी शिक्षण, मुलींचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, विधवांचे शिक्षण अशा वेगवेगळ्या दिशांनी या भागाची पावलं पडत गेली.
लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्या अनेक सामाजिक-राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या नेत्यांमुळे या प्रांताने ही प्रगती केली होती.
बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी आपापल्या संस्थांनांमध्ये अनेक क्रांतिकारक पावलं टाकून स्वतःपासूनच बदलांची सुरुवात केली होती.
राजसत्तेचे प्रमुख असूनही शैक्षणिक, राजकीय, सामाजिक बदलांसाठी आवर्जून बदल करणाऱ्या नेत्यांमध्ये यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. त्यानंतरच्या काळात औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधींचं नावही यामध्ये घेतलं जातं.
राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता. त्या निमित्ताने आपण त्यांच्या जीवनाची आणि कार्याची माहिती येथे संक्षिप्तरुपात घेत आहोत.
आधी हे लक्षात घेणं आवश्यक
राजर्षी शाहू महाराज यांची माहिती घेताना छ. शिवाजी महाराजांच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही घराण्यांमध्ये अनेक व्यक्तींची नावं एकसारखीच असल्याचं लक्षात ठेवावं लागेल.
शिवाजी, संभाजी, राजाराम, शाहू ही नावं अनेक पिढ्यांमध्ये दिसून येतात. तसेच शाहू हे नावही अनेक जणांचं असल्याचं दिसतं. विशेषतः संभाजी महाराजांचे पुत्र शाहू आणि कोल्हापूरचे शाहू महाराज हे इतिहासात जास्त प्रसिद्ध असल्यामुळे या दोन व्यक्तींमध्ये गल्लत होण्याची शक्यता असते.
त्यामुळे साताऱ्याचे छ. संभाजीपुत्र शाहू महाराज वेगळे आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे महाराज वेगळे हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
कोल्हापूरच्या गादीची थोडक्यात माहिती
आता कोल्हापूरची गादी किंवा कोल्हापूरची सत्ता कशी तयार झाली हे पाहू. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम छत्रपती झाले. त्यांच्या मृत्यूनंतर राजाराम यांची पत्नी ताराबाई ज्या महाराणी ताराराणी या नावाने ओळखल्या जातात, त्यांनी पन्हाळा येथे आपला मुलगा शिवाजी यांच्यानावाने कारभार सुरू केला.
मात्र नंतर पन्हाळ्यावर अचानक झालेल्या क्रांतीत ताराराणी आणि छ.शिवाजी यांना कैद करुन राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचा मुलगा संभाजी यांनी सत्ता ताब्यात घेतली.
या दुसऱ्या संभाजी यांचा मृत्यू 1760 साली झाला. त्यांच्याजागी 1762 साली दुसरे शिवाजी हे दत्तकपुत्र आले. त्यांनी आपली राजगादी पन्हाळ्यावरुन कोल्हापूरला नेली. त्यांचा मृत्यू 1813 साली झाला.
आता राजगादीवर त्यांचे पुत्र आबासाहेब आले. त्यांचा मृत्यू 1821 साली झाला.
या आबासाहेबांनंतर शहाजी म्हणजेच बुवासाहेब कोल्हापूरच्या गादीवर आले. त्यांचा 1829 साली मृत्यू झाला.
त्यानंतर राजगादीवर तिसरे शिवाजी म्हणजे बाबासाहेब आले.
कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्याचे प्रवेशद्वार, आज हा परिसर भवानी मंडप नावाने ओळखला जातो.
फोटो कॅप्शन,कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्याचे प्रवेशद्वार, आज हा परिसर भवानी मंडप नावाने ओळखला जातो.
बाबासाहेबांनंतर 1866 साली राजाराम नावाचे दत्तकपुत्र कोल्हापूरचे महाराज झाले. त्यांचे 1870 साली इटलीतील फ्लॉरेन्स येथे निधन झाले.
त्यांच्यानंतर चौथे शिवाजी नावाने नारायणराव दत्तक आले. या काळात कागलचे जयसिंगराव घाटगे कोल्हापूरचे राजप्रतिनिधी म्हणून काम पाहात होते. 1883 साली चौथे शिवाजी यांचे अहमदनगर येथे निधन झाले.
त्यानंतर कोल्हापूरच्या राजगादीवर जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंत यांना दत्तक घेण्यात आलं. हेच शाहू महाराज नावाने प्रसिद्ध झाले.
अग्निवापराच्या इतिहासाचा मागोवा
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
केंद्र सरकारतर्फे पेपरफुटी विरोधातील कायदा
21 जून 2024 पासून लागू करण्यात आला आहे.
Join - @eMPSCKatta
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची खेळाडू उमेदवारासह शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8991
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8992
जॉईन - @eMPSCKatta
स्पर्धा परीक्षा पुढे का ढकलाव्या लागतात?
मुलांच्या आयुष्याशी खेळ थांबवा!
Join us here @eMPSCKatta
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निनम्र अभिवादन .....!
Join - @eMPSCKatta
मुंबई महापालिकेत 52,221 पदे रिक्त
1 लाख कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण.
जॉईन - @eMPSCkatta