आर्थिक विकास (Economic Development) :
‘आर्थिक विकास’ ही ‘आर्थिक वृद्धी’ पेक्षा एक व्यापक संकल्पना आहे. ती एक गुणात्मक संकल्पना आहे.
‘विकास’ या संकल्पनेत केवळ आर्थिक वृद्धीच नव्हे, तर जीवनाच्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदलांचाही समावेश होतो. (पुढे केवळ आर्थिक विकासाच्या संकल्पनेची चर्चा केलेली आहे.)
‘आर्थिक विकासा’ मध्ये आर्थिक वृद्धीबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील इच्छित बदल आणि इतर तांत्रिक व संस्थात्मक बदल, यांचा समावेश होतो.
दुसर्या भाषेत, आर्थिक वृद्धी होत असतांना दर डोई वास्तव उत्पन्न, दारिद्रय, बेरोजगारी, देशातील उपन्नाचे वितरण इत्यादींमध्ये काय बदल होत आहे, यातून आर्थिक विकास सुचीत होत असेल.
म्हणजेच, आर्थिक वृढीमुळे निर्माण होणारे फायदे मुठभर भांडवलदारांपूरती मर्यादित न राहता, त्यामुळे सर्वासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असतील, त्यांच्या हातात पर्याप्त क्रमशक्ती निर्माण होत असेल, दारिद्र्याचे प्रमाण कमी होऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावत असेल व देशातील आर्थिक व सांपक्तिक विषमता कमी होत असेल, तरच आर्थिक विकास होत आहे, असे म्हटले जाईल.
अशा रीतीने, आर्थिक वृद्धीचे फायदे तळागाळातील शेवटच्या व्यक्ती व गटांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजेच आर्थिक विकास होय.
थोडक्यात, आर्थिक विकास म्हणजे ‘आर्थिक वृद्धी+बदल’ असे म्हणता येईल.
येथे ‘बदल’ ही संकल्पना अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदल दर्शविते. त्यामध्ये दारिद्रय कमी होणे, रोजगार निर्मिती, विषमता कमी होणे, राहाणीमानाचा दर्जा उंचावणे, कार्यक्षमता वाढणे, तंत्रज्ञान विकास, औधोगिक व सेवा क्षेत्रांचा वेगाने विकास, व्यक्तींच्या दृष्टीकोनांमध्ये सकारात्मक बदल, यांसारख्या सकारात्मक बदलांचा समावेश होतो.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आर्थिक वृद्धी (Economic Growth) :
आर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना असून देशातील वस्तु व सेवांच्या एकूण आकारमानात वाढ होणे म्हणजेच आर्थिक वृद्धी होणे होय. म्हणजेच, राष्ट्रीय उत्पन्न वाढत जणाच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हटले जाते.
अर्थात राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले म्हणून त्यास आर्थिक वृद्धी म्हणणे अयोग्य ठरते.
आर्थिक वृद्धीचे मोजमाप साधारणत: जी.डी.पी.च्या संदर्भात केले जाते.
अशा रीतीने, देशाचा जी.डी.पी. वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी असे म्हणतात, तर एका वर्षाचा जी.डी.पी. मागील वर्षाच्या जी.डी.पी. च्या तुलनेत जेवढ्या टक्क्यांनी वाढलेल्या असतो त्यास आर्थिक वृद्धी दर असे म्हणतात.
वृद्धी दर धनात्मक किंवा ऋणात्मक असे शकतो.
वस्तू व सेवांचे भौतिक उत्पादन वाढणे, हे खरे आर्थिक वृद्धीचे धोतक आहे.
वास्तु व सेवांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने वाढलेले जी.डी.पी. आर्थिक वृद्धी दर्शवित नाही. त्यामुळे खरी आर्थिक वृद्धी नॉमिनल जी.डी.पी.तील वाढीच्या तुलनेत वास्तव जी.डी.पी. (real GDP) वाढीने चांगल्या प्रकारे निर्देशित केली जाते.)
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क')
सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2023साठी उपयुक्त संदर्भ...
गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर
गट ब व गट क 2022 च्या पेपरसह
2023-24 च्या अर्थसंकल्पासह प्रकाशित
5 फेब्रुवारी 2023 रोजी प्रकाशित
https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/
मानव विकास अहवाल 2021 /2022
जागतिक भूक निर्देशांक 2022
जागतिक शांतता निर्देशांक 2022
जागतिक विकास अहवाल 2022
लेटेस्ट सर्वे व रिपोर्ट 2022-2023
आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ
अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ.
Join us @MPSCMaterialKatta