🛑बेहरामजी मलबारी🛑
👉मेहरवानजी यांचा मलबार किनारपट्टीवरून मसाले व सुगंधी द्रव्ये आणून सुरतमध्ये विकण्याचा व्यवसाय होता; त्यामुळे त्यांना मलबारी म्हणून ओळखले जात असे.
👉बेहरामजी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुरतमधील आयरिश प्रेझबिटेरिअन मिशन स्कूलमध्ये झाले. ते १८७१ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मिशनरी शाळेत शिकलेल्या बेहरामजींवर रेव्हरंड डॉ. विल्सन यांच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता. बेहरामजी पुढे मुंबईला आले व होरमुसजी जहांगीर यांच्या मालकीच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले (१८७६).
👉बेहरामजी यांचा विवाह धनबाईजी यांच्याशी झाला (१८७४). त्यांना तीन मुले व दोन मुली होत्या.
👉समाजसुधारणेच्या कार्यात आयुष्यभर स्वत:स वाहून घेणारे बेहरामजी यांनी पत्रकार म्हणूनही ख्याती मिळविली. प्रसिद्ध पारशी व्यावसायिक सर कासवजी जहांगीर यांनी बेहरामजी यांची ओळख टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक मार्टीन वूड यांच्याशी करून दिली. तेव्हापासून त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची सुरुवात झाली.
👉पुढे वूड यांनी बॉम्बे गॅझेट हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकामधून बेहरामजी यांनी गुजरात आणि गुजरातीज ही लेखमाला लिहिली. तसेच इंडियन स्पेक्टॅटर या साप्ताहिकामधून त्यांनी स्तंभलेखन करण्यास सुरुवात केली. इंडियन स्पेक्टॅटर हे साप्ताहिक त्यांनी विकत घेतले (१८७९) व अखेरपर्यंत त्यांनी संपादक म्हणून काम केले.
👉दादाभाई नवरोजी व विल्यम वेडरबर्न यांनी चालविलेल्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकामध्येही त्यांनी लेखन केले. ईस्ट अँड वेस्ट या नियतकालिकाचेही ते संपादक होते (१९०१–१२).
👉बेहरामजी हे एक उत्तम गुजराती कवी होते. त्यांनी सन १८७५ मध्ये नितिविनोद हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.
👉यात त्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाहाच्या प्रथेतून महिलांवर लादले गेलेले वैधव्य यांबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. १८७६ मध्ये त्यांनी इंडियन म्यूज इन इंग्लिश गार्ब हा इंग्रजी काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. याचबरोबर गुजरात अँड गुजरातीज (१८८२), द इंडियन आय ऑन इंग्लिश लाइफ (१८९१), सोशल रिफॉर्म इन इंडिया : इट्स स्कोपॲन्ड इम्पॉर्टन्स (१८८६), ॲन अपील फ्रॉम द डॉटर्स ऑफ इंडिया (१८९०) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे भारतीय स्त्रियांचा सामाजिक दर्जा वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शिवाय त्यांनी बालविवाहाला कडाडून विरोध करत विधवांच्या पुनर्विवाहाचे जोरदार समर्थन केले.
👉बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य – काही टिपणे (१८८४) या लेखातून त्यांनी बालवैधव्यावर प्रकाश टाकला. १८८४–१८९१ या कालखंडात बेहरामजी मलबारी यांनी चालविलेल्या व्यापक आंदोलनामुळे ब्रिटिश शासनाला संमती वयाचा कायदा (१८९१, द एज ऑफ कन्सेन्ट ॲक्ट) संमत करावा लागला.
👉जर्मन प्राच्यविद्यापंडित माक्स म्यूलर यांच्या हिबर्ट व्याख्यानमालेतील ऑरिजिन अँड ग्रोथ ऑफ रिलिजन (१८७८) या भाषणांचा बेहरामजी यांनी गुजराती भाषेत अनुवाद केला (१८८१).
👉बेहरामजी यांचा म्यूलर यांच्याशी पत्रव्यवहार होता. समाजसुधारक दयाराम गिडूमल यांच्या सहकार्याने मुंबई येथे त्यांनी ‘सेवासदनʼ ही संस्था स्थापन केली (११ जुलै १९०८).
👉 सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून निराश्रित व अनाथ स्त्रियांचा विकास घडवून आणणे हे या संस्थेचे ध्येय होते. मुंबईप्रमाणेच अहमदाबाद व सुरत येथेही ‘सेवासदन’च्या शाखा स्थापन करण्यात आल्या.
👉बेहरामजी यांनी क्षयरुग्णांसाठी कन्सम्पटिव्ह होम्स सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून १९०९ मध्ये सिमला रोडवरील धर्मपूर या ठिकाणी ‘किंग एडवर्ड सॅनिटेरियम’ सुरू केले. यामुळे अनेक रुग्णांना फायदा झाला. या सोसायटीला पतियाळा, ग्वाल्हेर आणि बिकानेर येथील राजांनी आर्थिक मदत केली होती..
👉बेहरामजी यांना मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली (१८८७), तसेच १८९६च्या दुष्काळात केलेल्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून कैसर-ए-हिंद या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले (१९००). १८८५ मध्ये मुंबई येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये ते सहभागी झाले होते.
👉सिमला येथे त्यांचे निधन झाले.
🍁☘🌷🍁☘🌷🍁☘🌷🍁🌷🍁☘🌷
🛑विष्णुबुवा ब्रह्मचारी(विष्णू भिकाजी गोखले)🛑
जन्म: शिरवली गावी, जिल्हा कुलाबा १८२५
कार्यकाळ: १८२५ - १८७१
गुरु: दत्तात्रय
समाधी: १८ फेब्रुवारी १८७१
विशेष: क्रांतीकारी समाज सुधारक
👉विष्णुबुवांना पाच भाऊ आणि पाच बहिणी. विष्णुबाबा भावंडांमध्ये दहावे. ते पाच वर्षांचे असतांना वडील गेले. तरीदेखील एक वर्ष वेदाध्ययन करता आले. त्याच काळात लेखन, वाचन, हिशेब करणे असे जीवनावश्यक शिक्षणही मिळाले. त्यात अक्षर अतिशय सुंदर! ह्या एवढया शिदोरीवर अवघ्या नवव्या वर्षी त्यांना त्या काळांत जमीन-महसूल खात्यात नोकरी मिळाली. पण आईने नोकरी सोडावयास लावून त्यांना पुन्हा घरच्या शेतीत आणि गाईगुरांना रानात चारण्यासाठी नेण्याचे काम करण्यास सांगितले. मात्र विष्णुबुवा फार काळ ह्या कामात रमले नाही. कोणाला न सांगता घर सोडून ते महाडला एका किराणा दुकानात नोकरी करु लागले. त्याच काळात सरकारी नोकरीसाठी आवश्यक ती परीक्षा देऊन साष्टी तालुक्यात कस्टम खात्यात रुजू झाले. सात वर्षांच्या नोकरीच्या काळात ते अनेक ठिकाणी फिरले.
👉हे करीत असतानाही त्यांची धार्मिक वृत्ती सतत सजग होती. एवढया लहान वयातही कीर्तन-प्रवचनें, पूजा-अर्चा नेमाने करीत असत. कधी ना कधी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देणारा गुरु मिळेल अशी त्यांना आशा वाटत असे. आत्मज्ञानाची त्यांची भूक काही शमेना. दुसरीकडे धार्मिक ग्रंथाचे वाचन, पठण, मनन चालूच होते. ह्या विषयातील त्यांची प्रगती एकलव्याप्रमाणे होत होती. अखेर व्यावहारिक जीवनाचा कंटाळा येऊन त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी नोकरी सोडली. घर त्यागले. पुन्हा गुरुप्राप्तिसाठी पुष्कळ हिंडूनही निराशाच पदरी आली. शेवटी सप्तशृंगीच्या डोंगरावर स्वतःच्या मनानेच घोर तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला.
👉ह्या आत्मसाक्षात्काराचा लाभ सर्व समाजालाही व्हावा, संपूर्ण हिंदु समाजाचा उत्कर्ष व्हावा म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. ख्रिश्चनांच्या धार्मिक अतिक्रमणाने ते अस्वस्थ झाले. त्यांनी ह्या धर्मांतरविरोधात लढा देण्यास सुरुवात केली. लेख लिहून आणि भाषणे करून ते ख्रिस्तीधर्मातील दोष लोकांना दाखवून देऊ लागले. त्यांच्या ह्या कार्याला उदंड प्रतिसाद मिळत गेला. उदंड म्हणजे किती? तर त्यांना व्याख्यानाला जागा कमी पडू लागली. 'कुठलीही शंका घेऊन या, मी त्या शंकांचे निरसन करण्यास समर्थ आहे' ह्या त्यांच्या आश्वासकतेमुळे लोकांना धीर आला.
👉समाजाची उन्नती होण्यासाठी स्त्री मुक्तीची आवश्यकता आहे. त्याचवेळी स्त्रीशिक्षणाची जोडही दिली जाणे गरजेचे आहे. हा विचार समाज मनावर त्यांनी प्रथम बिंबविण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरीनेच स्त्रीचा विवाह तिच्या अनुमतीने व्हावा, तो योग्य वयात व्हावा. पती-पत्नींमध्ये वयाचे अंतर फार नसावे, तीस वर्षांवरील गृहस्थाने विधवेशीच लग्न करावे. सतीप्रथा पूर्णतः बंद होणे गरजेचे आहे, विधवा विवाह होणे आवश्यक आहे. जाती किंवा वर्ण जन्मावरुन न ठरविता कर्मावरुन ठरविणे योग्य ठरेल, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावयास हवे. असे अनेक क्रांतिकारक विचार त्यांनी सतत सोळा वर्षें आपल्या व्याख्यानांमधून समाजासमोर मांडले.
👉१८७१ मध्ये ह्या जगाचा निरोप घेतला.
🌷🌷☘☘🌷🌷☘☘🌷🌷☘☘🌷
अहवालातील तरतुदी:
» भारतातील त्यावेळच्या प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू करण्यात यावे
» कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठे स्थापन करण्यात यावीत
» भारतात सर्वत्र शाळांचे जाळे उभारावे व आम जनतेस शिक्षण मिळण्याची व्यवस्था करावी
» ज्या खाजगी संस्था धर्मनिरपेक्ष शिक्षण देतात, ज्यांचे व्यवस्थापन चांगले आहे, ज्या शासकीय नियमांचे काटेकोर पालन करतात व शाळांची तपासणी करू देतात आणि ज्या विद्यार्थ्यांकडून थोडे का होईना, शैक्षणिक शुल्क जमा करतात अशा शाळांना अनुदान द्यावे
» नव्या शाळांना प्रशिक्षित शिक्षक मिळावेत, म्हणून शिक्षकांच्या प्रशिक्षिणाचे कार्य हाती घ्यावे.
» अहवालात स्त्रियांचे शिक्षण आणि शिक्षितांना रोजगार कसा द्यावा, या विषयांची चर्चाही केली आहे.
🛑छत्रपती शाहू महाराजांनी खालील ब्राम्हणतेर वृत्तपत्रांना मदत केली 🛑
👉 विजयी मराठा
👉जागृती
👉दिनमित्र
👉तरुण मराठा
👉कैवारी
👉तेज
👉राष्ट्रवीर
👉डेक्कन रयत
👉जागरूक
👉हंटर
👉प्रबोधन
🌷🌷🌷🍁🍁🍁🌷🌷🌷🍁🍁🍁🌷🌷🌷
अहवालाचा परिणाम:-
» तेव्हाच्या पाच प्रांतांत शिक्षणखात्यांची स्थापना झाली.
» कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर विद्यापीठे स्थापन झाली.
» प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले.
🌷🌷🍁🍁☘☘🌷🌷🍁🍁☘☘🌷🌷
१८५३ मध्ये ‘हाउस ऑफ कॉमन्स’ ची एक समिती भारतातील शैक्षणिक विकासाचा आढावा घेण्यासाठी नेमली गेली.
या समितीच्या वृत्तांतावर आधारित असा अहवाल वा खलिता संचालक मंडळाने (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) दिनांक १९ जुलै १८५४ रोजी पाठविला. ब्रिटिश अधिकारी चार्ल्स वुड याच्या आग्रहावरून हा अहवाल लिहिला गेल्याने, त्यास ‘वुडचा अहवाल’ असे म्हणतात.