जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
Читать полностью…राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
भारतीय शहीद दिवस
जॉईन - @eMPSCKatta
नव्या खाजगी बँका-
1991 च्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्यावर स्थापन करण्यात आलेल्या वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक नरसिंहन समितीने बँकिंग क्षेत्रावरील नियंत्रण दूर करण्याबाबत शिफारसी केल्या. त्यानुसार, RBI ने जानेवारी 1993 मध्ये खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.
या शिथिल धोरणाच्या आधारावर सुरूवातीला 10 नव्या खाजगी बँकांची स्थापना झाली. युटीआयबँक (अहमदाबाद) ही त्यांच्यापैकी पहिली बँक होती. त्यांना नव्या खाजगी बँका असे म्हणतात. कालांतराने त्याची संख्या वाढली.
मात्र विलीनीकरणामुळे (फेब्रुवारी, 2013) केवळ 7 नव्या खाजगी बँका कार्यरत आहेत. खाजगी क्षेत्रात नव्या बँका स्थापन करण्याच्या RBI च्या जानेवारी 1993 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये RBI ने 3 जानेवारी 2001 मध्ये काही बदल घडवून आणले.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁