काही व्याख्या :
श्रम शक्ती (Labour Force) –
श्रम शक्तिमध्ये काम करण्यार्या किंवा काम शोधत असलेल्या किंवा कामासाठी उपलब्ध आलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश होतो.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
किरकोळ मजुरी कामगार (Casual Wage Labour) –
हे कामगार इतरांच्या कृषि किंवा गैर-कृषि उपक्रमांमध्ये (घरगुती तसेच गैर-घरगुती) काम करतात आणि त्या बदल्यात मालकाशी करारानुसार दैनिक किंवा ठराविक कलावधिनुसार मजुरी मिळवितात.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
// SpardhaGram //
संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा फायनल टच
ऑनलाईन वन-डे रिव्हिजन बॅचेस
◆ अर्थव्यवस्था
◆ राज्यव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ भूगोल
◆ इतिहास
◆ सामान्य विज्ञान
माफक फी
अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
जॉईन करा @SpardhaGram
स्वंय-रोजगारी (Self-Employed) –
हे व्यक्ती स्वत:चे कृषि किंवा गैर-कृषि उपक्रम चालवितात किंवा ते स्वतंत्र व्यवसाय किंवा व्यापारात एकटे किंवा भागीदारांसहीत गुंतलेले असतात.
त्यांचे अजून तीन गट केले जातात.
स्वयं – लेखा कामगार (Own-account Workers) –
भाडोत्री कामगारांविना आपला उपक्रम/व्यवसाय चालविणारे
रोजगार देणारे (Employers) –
भाडोत्री कामगारांच्या सहाय्याने आपला उपक्रम/व्यवसाय चालविणारे
मदतनीस (Helpers) –
स्वत:च्या घरगुती उपक्रमांमध्ये पूर्ण किंवा अंशकालीन काम करणारे असे व्यक्ती ज्यांना कोणताही नियमित मोबदला मिळत नाही.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कामगारांचे वर्गीकरण :
कामगारांचे त्यांच्या रोजगाराच्या स्तरावरून तीन गट केले जातात.
नियमित पगारदार/मजुरी कामगार (Regular Salaried/Wage Employees) –
हे इतरांच्या कृषि किंवा गैर-कृषि उपक्रमांमध्ये (घरगुती तसेच गैर-घरगुती) काम करतात आणि त्या बदल्यात नियमित आधारावर पगार किंवा मजुरी मिळवितात.
त्यामध्ये काल मजुरीबरोबरच (time wage) अंश मजुरी (piece wage) मिळविणार्या चाही समावेश होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸