marathi | Education

Telegram-канал marathi - मराठी व्याकरण

221198

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Subscribe to a channel

मराठी व्याकरण

समानार्थी शब्द :

झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
झगडा - कलह, भांडण, तंटा
 
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
टूक - कुशलता, युक्ती, टक
 
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
ठाम - पक्का, कायम, दृढ
 
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
डोके - माथा, मस्तक, शिर
 
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
ढग - घन, जलद, मेघ, नीरद
 
ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
ढोल - नगारा, डंका, पडघम
 
तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश

आमच्या चॅनेल वर जॉईन होण्यासाठी @marathi यथे क्लीक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹समानार्थी शब्द

अलक्ष - परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान 
अमृत - सुधा, पीयूष, संजीवनी 
अरण्य - वन, जंगल, रान, विपिन 
अग्नी - विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल 
अश्व - तुरंग, घोडा, वारू, वाजी 
अर्जुन - पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत 
अमर्याद - असंख्य, अगणित, अमित 
अंबर - गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ 
अपयश - पराभव, हार, अपमान, अयश 
अवधी - समय, वेळ, काळ, अवकाश 
आई - जननी, माऊली, माय, माता, जन्मदात्री 
आठवण - ध्यान, स्मरण, संस्मरण, स्मृती 
आकांत - हंबरडा, आक्रोश, रुदन 
आनंद - उल्हास, हर्ष, संतोष, मोद 
आशय - भावार्थ, अर्थ, तात्पर्य 
आशा - आस, इच्छा, अपेक्षा, वासना, आकांक्षा 
इंद्र - वज्रपाणी, शक्र, वासव, देवेंद्र, सहस्त्राक्ष 
इष्ट - आवडते, प्रिय मानलेले 
*इब्लिस - बदमाश, खोडकर, विचित्र 
उकल - उलगडा, सुटका, मोकळे 
उधळणे - फेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे, स्वैर धावणे 
उपाय - तजवीज, इलाज, उपचार 
उमाळा - तरंग, लोट, उकळी 
ऊब - आधार, सुख, उष्णता, वाफ 
उत्कर्ष - प्रगती, संपन्नता, भरभराट, चलती एक

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹समानार्थी शब्द:

अलक्ष - परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान
 
अमृत - सुधा, पीयूष, संजीवनी
 
अरण्य - वन, जंगल, रान, विपिन
 
अग्नी - विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल
 
अश्व - तुरंग, घोडा, वारू, वाजी
 
अर्जुन - पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत
 
अमर्याद - असंख्य, अगणित, अमित
 
अंबर - गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ
 
अपयश - पराभव, हार, अपमान, अयश
 
अवधी - समय, वेळ, काळ, अवकाश
 
आई - जननी, माऊली, माय, माता, जन्मदात्री
 
आठवण - ध्यान, स्मरण, संस्मरण, स्मृती
 
आकांत - हंबरडा, आक्रोश, रुदन
 
आनंद - उल्हास, हर्ष, संतोष, मोद
 
आशय - भावार्थ, अर्थ, तात्पर्य
 
आशा - आस, इच्छा, अपेक्षा, वासना, आकांक्षा
 
इंद्र - वज्रपाणी, शक्र, वासव, देवेंद्र, सहस्त्राक्ष
 
इष्ट - आवडते, प्रिय मानलेले
 
इब्लिस - बदमाश, खोडकर, विचित्र
 
उकल - उलगडा, सुटका, मोकळे
 
उधळणे - फेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे, स्वैर धावणे
 
उपाय - तजवीज, इलाज, उपचार
 
उमाळा - तरंग, लोट, उकळी
 
ऊब - आधार, सुख, उष्णता, वाफ
 
उत्कर्ष - प्रगती, संपन्नता, भरभराट, चलती एक

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹सराव प्रश्न :

१) 'भाववाचक नाम' ओळखा
१) उंची ✅✅
२) शरद
३) पुस्तक
४) झाडे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
२) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा
१) ती हळू चालते
२) रघु खूप झोपला
३) रमेश दुध पितो ✅✅
४) तो मूर्ख आहे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
३) कंसातील शब्दांचे सामान्यरूप निवडा .
माझ्या ( अंगण ) एक वडाचे झाड आहे
१) अंगणाला
२) अंगणाशी
३) अंगणाचे
४) अंगणा ✅✅
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
४) 'परंतु' हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?
१) उभयान्वयी अव्यय ✅✅
२) शब्दयोगी अव्यय
३) क्रियाविशेषण अव्यय
४) केवलप्रायोगी अव्यय
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
५) कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ..........म्हणतात
१) वाक्य
२) शब्दसमूह
३) कर्तरी प्रयोग
४) प्रयोग ✅✅
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
६) ' पुस्तक ' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?
१) नपुसंकलिंग ✅✅
२) पुल्लिंग
३) स्त्रीलिंग
४) यापैकी नाही
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
७) ' मी निबंध लिहिते असे ' या वाक्यातील काळ ओळखा
१) रीती भूतकाळ ✅✅
२) रीती वर्तमानकाळ
३) रीती भविष्यकाळ
४) अपूर्ण भूतकाळ
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
८) ' आणि ' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?
१) विकल्पबोधक
२) परिणामबोधक
३) संकेतबोधक
४) समुच्चयबोधक ✅✅
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
९) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये 'अरेरे 'हा कोणता अव्यय आहे ?
१) उभयान्वयी
२)क्रियाविशेषण
३)केवलप्रयोगी ✅✅
४)शब्द योगी
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
१०) खालीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण कोणते ?
१) तुला पुस्तक हवे की पेन्सिल हवी ?
२)पाऊस आला आणि हवेत गारवा झाला.✅✅
३) मला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक.
४)खुप अभ्यास केला म्हणून पास झालो.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
११)'बाभळी मुद्रा व देवळी निद्रा 'या म्हणीचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
१) दिसण्यास बावळट व व्यवहार चतुर माणुस✅✅
२)अत्यंत बावळट माणुस
३)बाभळीखाली असणा-या देवळात झोपणारा
४)खूपच आळशी माणुस
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
१२) गडद निळे गडद निळे जलद भरून आले,
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले |
हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
१) यमक
२)पुष्यमक
३)अनुप्रास✅✅
४) श्लेष
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
Telegram.me/Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹अलंकार
〰〰〰〰〰〰〰


✔५) पर्यायोक्ती:- एखादी गोष्ट आडवळणाने सांगणे.त्याचे वडील 'सरकारी पाहुणचार' घेत आहेत. ( तुरुंगात आहेत)
〰〰〰〰〰〰〰
✔६) विरोधाभास:- एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो.
〰〰〰〰〰〰〰〰
🔺उदा:-
1. जरी आंधळी मी तुला पाहते
2. सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही
〰〰〰〰〰〰〰〰
✔७) व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार
आहे.

1. "जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो."
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔺उदा.-
'अमृताहुनि गोड नाम तुझे देवा'

🔺स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे
उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत
या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे ) असे
वर्णन केलेले असल्यामुळे इथे 'व्यतिरेक' अलंकार झालेला आहे.

🔺अन्य उदाहरणे-

1. कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान

2. तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतळ |
पाणियाहुनि पातळ | कल्लोळ प्रेमाचा ||

3. सावळा ग रामचंद्र
रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहून लाजून
चंद्र आभाळी लोपतो
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
✔८) रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

1. उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.

🔺उदा:
बाई काय सांगो
स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी
मज होय
ऊठ पुरुषोत्तमा
वाट पाहे रमा
दावि मुखचंद्रमा
सकळिकांसी
〰〰〰〰〰〰〰〰〰
✔९) अतिशयोक्ती:- अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

1. अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो.

2. उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.

🔺उदा:
जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर
〰〰〰〰〰〰〰〰〰
✔१०) अनन्वय:- अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
1. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.

🔺उदा:
आहे ताजमहाल एक जगती तो तोच
त्याच्यापरी या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान
➖➖➖➖➖➖➖➖
क्रमशः

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹नाम

🎾 व्यक्ती वस्तू स्थळाच्या नावाला नाम म्हणतात.

🎾 *प्रत्यक्ष दिसणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तू व्यक्ती स्थळाच्या नावाला नाम म्हणतात*.

🏀कल्पनेने जाणलेल्या म्हणजे स्वर्ग

नरक अशा बाबी.


🏀उदा....

पाटी , वही , पेन ,

*खालील सर्व शब्दांना व्याकरणात नाम असे म्हणातात*



*जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम म्हणतात*

🏀 *मुलांची नवे*-------    :    राजेश    दिनेश
रमेश जयेश     



🏀 *मुलींची नावे*   :    संगीता     

शीतल    कुसुम 


🏀 *पक्ष्यांची नावे*:     मोर           
🏀प्राण्यांची नावे :    हत्ती            

चिमणी  पोपट 




🏀 *फुलांची नावे* :     झेंडू            

मोगरा , गुलाब 


🏀 *फळांची नावे*:     पपई           
पेरू  , आंबा 


🏀 *भाज्यांची नावे*:   भोपळा ,   भेंडी , कोबी 


🏀 *वस्तूंची नावे*:      फळा ,       खुर्ची   , टेबल 


🏀 *पदार्थांची नावे* :    चकली   ,चिवडा   ,लाडू 


🏀 *नद्यांची नावे*:       गोदावरी    ,  यमुना   , गंगा


🏀 *पर्वतांची नावे*     सातपुडा      सह्याद्री    हिमालय 


🏀 *अवयवांची नावे*-- नाक      ,     कान  ,   डोळा 


🏀 *नात्यांची नावे* आई           बहीण      भाऊ 



🏀 *काल्पनिक नावे*:  परी ,  राक्षस    ,      देवदूत 


🏀गुणांची नावे :       महानता     नम्रता    ,शौर्य 


🏀 *मनःस्थितीची नावे*: उदास     दुःख    ,  आनंद 



🏀 *माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी, त्यांचे गुण, काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली आहेत, त्यांना नाम म्हणतात*

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹वाक्य पृथक्करण

🔸पृथक म्हणजे वेगळे किंवा सुटे करणे असा होतो आणि वाक्यापृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे.

🔷वाक्य:⤵

उद्देश विभाग(उद्देशांग)↔विधेय विभाग
(विधेयांग)
1)उद्देश (कर्ता)     ↔1) कर्म व कर्म विस्तार
2)उद्देश विस्तार     ↔2) विधानपूरक
                           ↔3) विधेय विस्तार
                           ↔4)  विधेय (क्रियापद)


💠उद्देश विभाग/उद्देशांग:💠

💠1)उद्देश (कर्ता)

🔸वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो.
🔸क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता येते.

🔶उदा.🔸

🔹रामुचा शर्ट फाटला.
➡(फाटणारे काय/कोण?)
🔹रामरावांचा कुत्रा मेला.
➡(मरणारे कोण/काय?)
🔹मोगल साम्राज्याचा अंत झाला.
➡(होणारे-कोण/काय?)
🔹रामुच्या घराचा दरवाजा उघडला.
➡(उघडणारे कोण/काय?)
👉वरील वाक्यात शर्ट, कुत्रा, अंत, दरवाजा हे उद्देश (कर्ता) आहेत.

💠2) उद्देश विस्तार

🔸कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील. तर अशा शब्दांना उद्देश विस्तारात लिहावे.

🔶उदा.🔸    

🔸शेजारचा रामु धपकन पडला.नियमित अभ्यास करणारे विधार्थी पास होतात.

🔶विधेय विभाग/विधेयांग.

🔸वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते.

🔶उदा.🔸

🔹रामने झडाचा पेरु तोडला.
➡(या वाक्यात तोडण्याची क्रिया पेरु वर झाली म्हणून ते कर्म.)

🔹गवळ्याने म्हशीची धार काढली.
➡(या वाक्यात काढण्याची क्रिया धारेवर झाली म्हणून ते कर्म)

💠1) कर्म विस्तार

🔷कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे कर्म विस्तार होय.

🔶उदा.🔸

🔸रामने झाडाचा पेरु तोडला.गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली.

💠2) विधान पूरक

🔷कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर ते विधानपूरक असते.

🔶उदा.🔸    

🔸राम राजा झाला.संदीप शिक्षक आहे.शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. वरील वाक्यावरुन राजा, शिक्षक, मोहक ही शब्द कर्त्याविषयी अधिक महितीसांगत आहेत म्हणून त्यांना विधानपूरक असे म्हणतात.

💠3) विधेय विस्तार

🔷क्रियापदास विधेय असे म्हणतात.

🔸वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्या  शब्दांचा यात समावेश होतो. क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास विधेय विस्तार उत्तर येते. ही सर्व क्रियाविशेषणे असतात.

🔶उदा.🔸   

🔸कुटुंबातील सर्व व्यक्ती रविवारी वनभोजनास गेले.शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.माझा जिवलग मित्र मनीष माझे पत्र पाहताच त्वरित आला.

💠4) विधेय/क्रियापद

🔷वाक्यातील क्रियापदाला विधेय असे म्हणतात.

🔶उदा.🔸

🔸रमेश खेळतो.
🔸रमेश अभ्यास करतो.
🔸रमेश चित्र काढतो.

आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @marathi येथे क्लिक करा व चॅनेल ओपन झाले की join ऑप्शन वर क्लिक करा.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹समास
✴✴✴बहुव्रीही समास✴✴✴

✳ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

✴उदा.    

❇नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
 
❇वक्रतुंड - ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
 
❇दशमुख - ज्याला दहा तोंड आहे असा (रावण) बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.

🔵i) विभक्ती बहुव्रीही समास -

✳ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.
 
✳अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

✴उदा.    

❇प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
 
❇जितेंद्रिय - जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
 
❇जितशत्रू - जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
 
❇गतप्राण - गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती

🔵ii) नत्र बहुव्रीही समास -

✳ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.
 या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.

✴उदा.    

❇अनंत - नाही अंत ज्याला तो
 
❇निर्धन - नाही धन ज्याकडे तो
 
❇नीरस - नाही रस ज्यात तो

🔵iii) सहबहुव्रीही समास -

✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.

✴उदा.    

❇सहपरिवार - परिवारासहित असा जो
 
❇सबल - बलासहित आहे असा जो
 
❇सवर्ण - वर्णासहित असा तो

🔵iv) प्रादिबहुव्रीही समास -

✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.

✴उदा.    

❇सुमंगल - पवित्र आहे असे ते
 
❇सुनयना - सु-नयन असलेली स्त्री
 
❇दुर्गुण - वाईट गुण असलेली व्यक्ती

Читать полностью…

मराठी व्याकरण

ल, मारुत, समीर, वायू
वाट = मार्ग, रस्ता
वाद्य = वाजप
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू
वेश = सोशाख
वेदना = यातना
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी
विद्या = ज्ञान
विनंती = विनवणी
विरोध = प्रतिकार, विसंगती
विसावा = विश्रांती, आराम
विश्व = जग, दुनिया
वीज = विद्युर, सौदामिनी
वृत्ती = स्वभाव
वृद्ध = म्हातारा
वैराण = ओसाड, भकास, उजाड
वैरी = शत्रू, दुष्मन
वैषम्य = विषाद
व्यवसाय = धंदा
व्याख्यान = भाषण
शरीर = देह, तनू, काया, कुडी, अंग
शक्ती = सामर्थ्य, जोर, बळ
शर्यत = स्पर्धा, होड, चुरस
शहर = नगर
शंकर = चंद्रचूड
श्वापद = जनावर
शास्त्रज्ञ = वैज्ञानिक
शाळा = विद्यालय
शाळुंका = शिविलिंग
शेत = शिवार, वावर, क्षेत्र
शीण = थकवा
शील = चारित्र्य
शीतल = थंड, गार
शिक्षा = दंड, शासन
श्रम = कष्ट, मेहनत
सकाळ = प्रभात, उष:काल
सचोटी = खरेपणा
सफाई = स्वच्छता
सवलत = सूट
सजा = शिक्षा
सन्मान = आदर
संकट = आपत्ती
संधी = मोका
संत = सज्जन, साधू
संपत्ती = धन, दौलत, संपदा
सायंकाळ = संध्याकाळ
सावली = छाया
साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा
स्तुती = प्रशंसा
स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज
स्थान = ठिकाण, वास, ठाव
स्त्री = बाई, महिला, ललना
संध्याकाळ = सायंकाळ, सांज
स्फूर्ती = प्रेरणा
स्वच्छता = झाडलोट
सुवास = सुगंध, परिमल, दरवळ
सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान
सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
सावली = छाया
सामर्थ्य = शक्ती, बळ
साहित्य = लिखाण
सेवा = शुश्रूषा
सिनेमा = चित्रपट, बोलपट
सिंह = केसरी, मृगराज, वनराज
सुविधा = सोय
सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ
सूत = धागा, दोरा
सूर = स्वर
सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता
सोने = सुवर्ण, कांचन, हेम
सोहळा = समारंभ
हद्द = सीमा, शीव
हल्ला = चढाई
हळू चालणे = मंदगती
हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा
हात = हस्त, कर, बाहू
हाक = साद
हित = कल्याण
हिंमत = धैर्य
हुकूमत = अधिकार
हुरूप = उत्साह
हुबेहूब = तंतोतंत
हेका = हट्ट, आग्रह
क्षमा = माफी

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹समास व त्याचे प्रकार

✴✴✴बहुव्रीही समास✴✴✴

✳ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

✴उदा.    

❇नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
 
❇वक्रतुंड - ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
 
❇दशमुख - ज्याला दहा तोंड आहे असा (रावण) बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.

🔵i) विभक्ती बहुव्रीही समास -

✳ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.
 
✳अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

✴उदा.    

❇प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
 
❇जितेंद्रिय - जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
 
❇जितशत्रू - जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
 
❇गतप्राण - गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती

🔵ii) नत्र बहुव्रीही समास -

✳ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.
 या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.

✴उदा.    

❇अनंत - नाही अंत ज्याला तो
 
❇निर्धन - नाही धन ज्याकडे तो
 
❇नीरस - नाही रस ज्यात तो

🔵iii) सहबहुव्रीही समास -

✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.

✴उदा.    

❇सहपरिवार - परिवारासहित असा जो
 
❇सबल - बलासहित आहे असा जो
 
❇सवर्ण - वर्णासहित असा तो

🔵iv) प्रादिबहुव्रीही समास -

✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.

✴उदा.    

❇सुमंगल - पवित्र आहे असे ते
 
❇सुनयना - सु-नयन असलेली स्त्री
 
❇दुर्गुण - वाईट गुण असलेली व्यक्ती

Читать полностью…

मराठी व्याकरण

📖केवल प्रयोगी अव्यय📖


आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांच्या केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.

1. हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
📄उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.

2. शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे

📄उदा. अरेरे! खूप वाईट झाले.

3. आश्चर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या

📄उदा. अबब! केवढा मोठा साप

4. प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी

📄उदा. शाब्बास! तू दिलेले काम पूर्ण केलेस.

5. संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा

📄उदा. अछा! जा मग

6. विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च

📄उदा. छे-छे! असे करू नकोस.

7. तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी

📄उदा. छी! ते मला नको

8. संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे

📄उदा. अहो! एकलत का ?

9. मौनदर्शक : चुप, चुपचाप, गप, गुपचुप

📄उदा. चुप! जास्त बोलू नको
✳️✏️✳️✏️✳️✏️✳️

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹विरूध्द अर्थी शब्द


👉 अतिरेकी✖विवेकी
👉 रसिक✖अरसिक
👉 अतिवृष्टी✖अनावृष्टी
👉 उदय✖अस्त
👉 अनुकूल✖प्रतिकूल
👉 ककृश✖मंजुळ
👉 अधोगती✖प्रगती
👉 गोड✖कडू
👉 अबोल✖बोलका
👉 अवनती✖उन्नती
👉 अमृत✖विष
👉 नीती✖अनीती
👉 आरंभ✖शेवट
👉 अंहकार✖विनंम्रता
👉 आशा✖निराशा
👉 गर्विष्ठ✖विनंम्र
👉 आळशी✖कामसू
👉 शूर✖भिञा
👉 आस्तिक✖नास्तिक
👉 आराम✖कष्ट
👉 इष्ट✖अनिष्ट
👉 अब्रू✖बेअब्रू
👉 उंच✖बुटका
👉 आगमन✖निगृमन
👉 अवाॅचीन✖प्राचीन
👉 निरभ्र✖आभ्राच्छादित
👉 एकमत✖दुमत
👉 आयात✖नियात
👉 उलट✖सुलट
👉 आदर✖अनादर
👉 उपद्रवी✖निरूपद्रवी
👉 आघाडी✖पिछाडी
👉 गुण✖अवगुण/दोष
👉 अपराधी✖निरपराधी
👉 साकार✖निराकार
👉 अशक्त✖सशक्त
👉 शकुन✖अपशकुन
👉 सुकाळ✖दुष्काळ
👉 अपमान✖सन्मान
👉 सावध✖बेसावध
👉 साम्यवाद✖भांडवलशाही
👉 अमावास्या✖पोर्णीमा
👉 हषृ✖खेद
👉 अवघड✖सोपे
👉 विकास✖र् हास
👉 प्रकाश✖काळोख
👉 विधवा✖सधवा
👉 कंजुस✖उदार
👉 गध्य✖पध्य
👉 मंद✖चपळ
👉 सुर✖असुर
👉 निःशस्ञ✖सशस्ञ
👉 विघटन✖संघटन
👉 स्वामी✖सेवक
👉 तेजी✖मंदी
👉 पाप✖पुण्य
👉 खोल✖उथळ
👉 नागरी✖ग्रामीण
👉 देव✖दानव
👉 कमाल✖किमान
👉 उचित✖अनुचित
👉 सुसंवाद✖विसंवाद
👉 तप्त✖शीतल
👉 खंडन✖मंडन
👉 स्वातंञ्य✖पारतंञ्य
👉 ज्ञान✖अज्ञान
👉 पचन✖अपचन
👉 सासर✖माहेर
👉 जहाल✖मवाळ
👉 वियोग✖संयोग
👉 संवाद✖विवाद
👉 श्वास✖निःश्वास
👉 सुसह्य✖असह्य
👉 सुरस✖निरस
👉 सबल✖दुबृल
👉 निंदा✖स्तुती
👉 रणशूर✖रणभीरू
👉 वंध्य✖निंध्य
👉 आंतरजातीय✖सजातीय
👉 वर✖वधू
👉 स्थूल✖कृश
👉 सुरूप✖कुरूप
👉 ज्ञात✖अज्ञात
___________________________________
Join us @marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹समास व त्याचे प्रकार

🅾तत्पुरुष समास :

🔸ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेल्या शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.
 
🔸थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

🌑उदा.    

↘महामानव - महान असलेला मानव
 
↘राजपुत्र - राजाचा पुत्र
 
↘तोंडपाठ - तोंडाने पाठ
 
↘गायरान - गाईसाठी रान
 
↘वनभोजन - वनातील भोजन

🔸वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
 
🔸तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.

🅾i) विभक्ती तत्पुरुष -

🔸ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्याग शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.
 
🔸वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.
 
🅾विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे :

🌑उदा

↘गुनहीन - गुणाने हीन - तृतीया तत्पुरुष
 
↘विधाभ्यास - विधेचा भास - षष्ठी तत्पुरुष
 
↘कर्मकुशल - कर्मात कुशल - सप्तमी तत्पुरुष

🅾ii) अलुक तत्पुरुष -

🔸ज्या विभक्ती तत्पुरुष अमासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.
 
🔸अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.

🌑उदा.    

↘तोंडी लावणे
 
↘पाठी घालणे
 
↘अग्रेसर

🅾iii) उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष -
ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.

🅾उदा.    

↘ग्रंथकार - ग्रंथ करणारा
 
↘शेतकरी - शेती करणारा
 
↘लाचखाऊ - लाच खाणारा
 
↘सुखद - सुख देणारा
 
↘जलद - जल देणारा वरील

🔸उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.
 
🔸नंतर दुसर्‍या पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.
 
🔸इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.

🅾iv. नत्र तत्पुरुष समास -

🔸ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष  असे म्हणतात.
 
🔸म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना  नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.
 
↘उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)

🌑उदा.    

↘अयोग्य - योग्य नसलेला
 
↘अज्ञान - ज्ञान नसलेला
 
↘अहिंसा - हिंसा नसलेला
 
↘निरोगी - रोग नसलेला

➡➡➡क्रमशः .........

Читать полностью…

मराठी व्याकरण

📙राधारमण
कृष्णाजी पांडुरंग लिमये

📒रामजोशी/कविराय
राम जनार्दन जोशी

📓वसंत
वासुदेव बळवंत पटवर्धन

📓वसंतविहार
शंकर दत्तात्रय जोशी

📗वा.दा.ओ.
वामन दाजी ओक

📕वामन पंडित
वामन तानाजी शेषे

📒विठाबाई
विठा रामप्पा नायक

📓विठा रेणुकानंदन
विठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी

📒विठ्ठल केरीकर
विठ्ठल नरसिंह साखळकर

📘विठ्ठलदास
विठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर

📗विंदा करंदीकर
गोविंद विनायक करंदीकर

📙विष्णुदास
कृष्णराव रावजी धांदरफळे

📔विसोबा खेचर
विसोबा चाटे

📓विहंगम
बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर

📙शारदाश्रमवासी
पुरुषोत्तम गोपाळ काणेकर

📘श्रीकृष्ण
श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर

📕श्रीधर
श्रीधर ब्रह्मानंद नाझलेकर

📔संजीव
कृष्ण गंगाधर दीक्षित

📗संजीवनी
संजीवनी मराठे

📓सरस्वतीकंठाभरण
दिनकर नानाजी शिंदे

📙साधुदास
गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर

📕साने गुरुजी
पांडुरंग सदाशिव साने

📔सांवतामाळी
सांवता परसूबा माळी

📔सुधांशु
हणमंत नरहर जोशी

📒सुहृद्चंपा
पुरुषोत्तम शिवराम रेगे

📔सौमित्र
किशोर कदम

📓विश्वसुत
एकनाथ विश्वनाथ पवार

📔स्वरूपानंद
रामचंद्र विष्णू गोडबोले

📙हरिबुवा
हरिबुवा शिंपी (हरीबोवा केरेश्वर भोंडवे)

📙होनाजी
होनाजी सयाजी शेलारखाने

📓📓 📖📙📰🗞✒📝✏🔍🔏📚📖💳
सर्वत्र शेअर करा..आपल्या नव्या पिढिना माहित असू द्या.

Читать полностью…

मराठी व्याकरण

म्हणी:
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे
2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा
7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा
12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे
13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर
15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो
17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते
21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती
23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे
24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नये.

Читать полностью…

मराठी व्याकरण

समानार्थी शब्द :

तापट - संतापी, चलाख

ताकीद - बजावून सांगणे, जरब, आज्ञा
 
ताठपणा - गर्व, अहंकार, उद्धटपणा
 
तिरस्कार - कंटाळा, वीट, तिटकारा
 
तेज - चकाकी, टवटवी, तजेला
 
तारणे - वाचविणे, सांभाळणे, सोडविणे
 
तळं - तलाव, धरण, तटाक
 
तरुण - जवान, यौवन, युवक
 
तोंड - मुख, वदन, आनन
 
त्रास - वैताग, ज्वर, ताप
 
थट्टा - चेष्टा, मस्करी, विनोद
 
थोर - श्रेष्ठ, मोठा, महान
 
थंड - गार, शीत, शीतल
 
दंग - मग्न, गुंग, आश्चर्यचकित
 
दंडक - नियम, चाल, वहिवाट
 
दामटणे - धमकी देणे, कोबणे
 
दरवेशी - फिरताभिक्षेकरी, माकड किंवा अस्वल घेऊन पोट भरणारा
 
दीन - दुबळा, गरीब, नम्र
 
देव - ईश, सुर, परमेश्वर, ईश्वर, अमर
 
देवालय - देऊळ, राऊळ, मंदिर
 
दुर्धर - अवघड, गहन, श्रीमंत
 
धनु - कमठा, कोदंड, चाप, धनुष्य
 
धनाढ्य - सधन, धनिक, श्रीमंत

Читать полностью…

मराठी व्याकरण

काही संधी :

१ मद् + अंध = मतांध प्रथम व्यंजन संधी

२ कृपा + ओघ = कृपौघ
( स्वरसंधी : आ+औ = औ जस कि गंगा + ओघ = गंगौघ )

३ नदी + उद् गम = नद्युद्गम
( स्वरसंधी : ई + उ = य + उ = यु जस कि अति + उत्तम = अत्युत्तम )

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹प्रश्नसंच

1. 'अडकित्ता' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

हिंदीफारसीकानडी  गुजराती

उत्तर : कानडी

2. 'पेशवा' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

कानडीगुजरातीफारसी  हिंदी

उत्तर : फारसी

3. 'लंबोदर व पीतांबर' ही खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?

बहुव्रीहि समास  तत्पुरुष समासद्वंद्वं समासयापैकी नाही

उत्तर : बहुव्रीहि समास

4. खालीलपैकी कोणता पर्यायाला 'अव्ययीभाव' समासाचे उदाहरण होईल?

बटाटेवडापंचवटीबेमालूम  तोंडपाठ

उत्तर : बेमालूम  

5. 'शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवावे' - या वाक्यातील प्रयोग ओळखा.

कर्तरी प्रयोगभावे प्रयोग  कर्मणी प्रयोगयापैकी नाही

उत्तर : भावे प्रयोग  

6. 'भरत म्हणून एक राजा होऊन गेला' - या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता?

कारणबोधक उभयान्वयी अव्ययस्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय  उपदेशबोधक उभयान्वयी अव्ययपरिणामबोधक उभयान्वयी अव्यय  

उत्तर : स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

7. 'मला फक्त शंभर रुपये हवेत' - या वाक्यातील फक्त या शब्दाचा प्रकार ओळखा.

सार्वनामिक विशेषणसाधित क्रिया विशेषणकेवलप्रयोगी अव्ययसंग्रहवाचक शब्दयोगी अव्यय  

उत्तर : संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय

8. 'अमका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

सर्वनामिक विशेषण         नामसाधित विशेषणअव्ययसाधित विशेषण         धातुसाधित विशेषण

उत्तर : सर्वनामिक विशेषण

9. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात सांगा.
आमच्या गावात बरेच पाटील आहेत.

भाववाचक नामसामान्य नामविशेषणविशेषनाम

उत्तर : सामान्य नाम

10. 'अनिल' च्या समानार्थी शब्द -

मत्स्यमंडूकरुणसमीरण

उत्तर : समीरण

------------------------------------
जॉईन करा @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹 स्वरांच्या र्‍हस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे वेगळे अर्थ होऊ शकतात.

(१) पाणि --हात पाणी --जल

(२) दिन --दिवस दीन --गरीब

(३) शिर --डोके शीर --रक्त वाहिनी

(४) पिक --कोकीळ पीक --धान्य

(५) सुत -- मुलगा सूत --धागा

(६) सुर --देव सूर --आवाज

(७) सलिल -पाणी सलील -लीलेने

(८)चाटु - संतोष देणारे चाटू -लाकडी पळी

(९) मिलन --भेट मीलन --मिटणे

जॉईन करा आमचे चॅनेल @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹क्रियापद

🏀 वाक्याच्या अर्थ पूर्ण करणार्‍या क्रियावाचक शब्दालाच 'क्रियापद' असे म्हणतात.

उदा....

1) गाय दूध देते.

2)आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो.

3)मुलांनी खरे बोलावे.

4)आमच्या संघाचे ढाल जिंकली.

🏀 *धातु*---- :

*क्रियापदातील प्रत्यय रहित मूल शब्दाला 'धातु' असे म्हणतात*

उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी.

🏀 *धातुसाधीते/ कृदंते*
धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्‍या शब्दांना 'धातुसाधीत' किंवा 'कृंदते' असे म्हणतात.

उदा....
🏀ह्या मुली पुर्वी चांगल्या गात.

🏀त्या आता गात नाहीत.

वरीला वाक्यात 'गा' या धातूला त
हा प्रत्यय लागून गात अशी क्रियावाचक रुपे आली आहेत.
पहील्या वाक्यात गात हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते.म्हणून ते क्रियापद
आहे.
दुसऱ्या वाक्यात गात हे केवळ धातूसाधित आहे.

🏀 *धातुसाधीते वाक्याचा शेवटी कधीच येत नाही ते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात*


🏀 *फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधीते क्रियापदाचे काम करते*

उदा.
क्रियापदे- केले, करतो, बसला, लिहितो, खातो.

धातुसाधिते- करून, बसता, लिहून, खतांना, खाणारी, लिहितांना, बोलतांना.

धावणे आरोग्यासाठी चांगले असते. (धावणे-धातुसाधीत, असते-क्रियापद)

🏀त्यांच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहेत. (खाणारी-विशेषण, खाणारी-धातुसाधीत, आहेत-क्रियापद)

🏀जहाज समुद्रात बुडतांना मी पाहिले. (बुडतांना- क्रियाविशेषण, बुडतांना-धातुसाधीते, पाहिले–क्रियापद)
क्यात क्रिया करणारा एक व ती.

उदा.
गाय दूध देते.

पक्षी मासा पकडतो.

गवळी धार काढतो.

राम आंबा खातो.

अनुराग निबंध लिहितो.

आरोही लाडू खाते.


🏀वाक्यात क्रिया ज्याच्यामार्फत होते त्याला कर्ता म्हणतात.

उदा......
गुरुजीनी फळ्यावर लिहिले.
यात कर्ता गुरुजी.

🏀वाक्यात क्रिया ज्याच्यावर घडली त्याला कर्म म्हणातात.
उदा....
राम चित्र काढतो इथे कर्म चित्र होते.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹विशेषण

खालील शब्दसमुह पहा....

चांगली मुले
काळा कुत्रा
पाच टोप्या
निळे आकाश


वरील शब्दसमुहात चांगली , काळा
पाच निळे हे शब्द त्या त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात .

🏀 *नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात*.

🎾विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करते.

🏀साधारणपणे विशेषण नामाच्या पुर्वी येते.

🏀ज्या नामाबद्दल विशेषण माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात.

उदा.....
वर चांगली मुले यामध्ये चांगली हे विशेष पण मुले हे विशेष्य होय.

काळा कुत्रा यामध्ये काळा हे विशेषण पण कुत्रा हे विशेष्य होय.

निळे आकाश यामध्ये निळे हे विशेषणा पण आकाश हे विशेष्य होय.


🏀 *प्राथमिक स्तरावर विशेषणाचे प्रकार*-----

🎾 *गुणविशेषण*

🎾 *संख्याविशेषण*

🎾 *सार्वनामिक विशेषण*

खालील शब्दसमुह पहा....

शुर सरदार

ताजी भाजी

🏀 *नामाचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेषण म्हणतात.

शुर हा सरदाराचा गुण दाखवला.

ताजी हे भाजीबद्दल विशेष बाब दाखवते .

🏀 *संख्याविशेषण*----

आठ दिवस

थोडी साखर

ज्या विशेषणामुळे नामांची संख्या दाखवली जाते त्यास संख्याविशेषण म्हणतात.

बारा महिने, तिसरा भाग आर्धा हिस्सा.

🏀 *सार्वनामिक विशेषण*--

हा कुत्रा

ती बाग

तुझा सदरा

कोणता चित्रपट.

वरील शब्दसमुहात ,हा , ती , तुझा
ही सर्व नामे आहेत.

सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाना सार्वनामिक विशेषण म्हणतात

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹अलंकार
〰〰〰〰〰〰〰
🔶व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार .
〰〰〰〰〰〰〰
🔶अलंकारांचे प्रकार:-
✔ १) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
〰〰 〰〰〰〰〰
1. "दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो."
2. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तु दुसर्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो.
🔺उदा:
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आभाळा गत माया तुझी आम्हांवरी राहू दे
〰〰〰〰〰〰〰
✔२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
〰〰〰〰〰〰〰
1. उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की)
🔺उदा:
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे
माहेरची वाटे खरेखुर
〰〰〰〰〰〰〰
✔३) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे) अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
〰〰〰〰〰〰〰
1. "उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो."
🔺उदा.-
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल |
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ||
🔺स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात 'कमळातल्या पाकळ्या' आणि 'शरदिचा चंद्रमा' या उपमानांनी अनुक्रमे 'नयन' आणि 'वदन' या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार झालेला आहे.
🔺अन्य उदाहरणे-
1. हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले |
2. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे |
3. आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी , ती हाक येई कानी मज होय शोक भारी , नोहेच हाक माते मारी , कुणी कुठारी
〰〰〰〰〰〰〰
✔४) अन्योक्ती:- अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
〰〰〰〰〰〰〰
1. दुसर्यास उद्देशून केलेली उक्ती.
2. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसर्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.
🔺उदा:-
येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू
करिशी अनेक हे मूर्ख यांस किमपीहि नसे
विवेक कोकिल वर्ण बघुनि म्हणतील काक
➖➖➖➖➖➖➖

Читать полностью…

मराठी व्याकरण

💢 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार💢

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच
'शब्दसिद्धी' असे म्हणतात.

⭕शब्दांचे खालील प्रकार पडतात.

🌀 तत्सम शब्द

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात.

💠उदा.
राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.

🌀 तदभव शब्द

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.

💠उदा.
घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.

🌀देशी/देशीज शब्द

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.

💠उदा.
झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.

🌀 परभाषीय शब्द :

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ' परभाषीय शब्द' असे म्हणतात.

🌀1) तुर्की शब्द

💠कालगी, बंदूक, कजाग

🌀2) इंग्रजी शब्द

💠टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

🌀 3) पोर्तुगीज शब्द
बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.

🌀4) फारशी शब्द
💠रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.

🌀 5) अरबी शब्द
अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.


🌀6) कानडी शब्द
हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.

🌀7) गुजराती शब्द
सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.

🌀8) हिन्दी शब्द
बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.

🌀 9) तेलगू शब्द
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.

🌀10) तामिळ शब्द
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.


....,.......

Читать полностью…

मराठी व्याकरण

समानार्थी शब्द
➖➖➖➖➖
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी
गरज = आवश्यकता
गवत = तृण
गर्व = अहंकार
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य
गोड = मधुर
गोणी = पोते
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान
ग्राहक = गिऱ्हाईक
घर = सदन, गृह, निकेतन, आलय
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके
घोडा = अश्व, हय, वारू
चव = रुची, गोडी
चरण = पाय, पाऊल
चरितार्थ = उदरनिर्वाह
चक्र = चाक
चऱ्हाट = दोरखंड
चाक = चक्र
चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू
चिंता = काळजी
चिडीचूप = शांत
चिमुरडी = लहान
चूक = दोष
चेहरा = मुख
चौकशी = विचारपूस
छंद = नाद, आवड
छान = सुरेख, सुंदर
छिद्र = भोक
जग = दुनिया, विश्व
जत्रा = मेळा
जन = लोक, जनता
जमीन = भूमी, धरती, भुई
जंगल = रान
जीव = प्राण
जीवन = आयुष्य, हयात
जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
झाड = वृक्ष, तरू
झोपडी = कुटीर, खोप
झोप = निद्रा
झोका = झुला
झेंडा = ध्वज, निशाण
ठग = चोर
ठिकाण = स्थान
डोके = मस्तक, शीर्ष, शीर
डोळा = नेत्र, नयन, लोचन
डोंगर = पर्वत, गिरी
ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र
ॠण = कर्ज
तक्रार = गाऱ्हाणे
तळे = तलाव, सरोवर, तडाग
त्वचा = कातडी
तारण = रक्षण
ताल = ठेका
तुरंग = कैदखाना, बंदिवास
तुलना = साम्य
थट्टा = मस्करी, चेष्टा
थवा = समूह
थोबाड = गालपट
दगड = पाषाण, खडक
दरवाजा = दार, कवाड
दाम = पैसा
दृश्य = देखावा
दृढता = मजबुती
दिवस = दिन, वार, वासर
दिवा = दीप, दीपक
दूध = दुग्ध, पय
द्वेष = मत्सर, हेवा
देव = ईश्वर, विधाता
देश = राष्ट्र
दार = दरवाजा
दारिद्र्य = गरिबी
दौलत = संपत्ती, धन
धरती = भूमी, धरणी
ध्वनी = आवाज, रव
नदी = सरिता
नजर = दृष्टी
नक्कल = प्रतिकृती
नमस्कार = वंदन, नमन
नातेवाईक = नातलग
नाच = नृत्य
निश्चय = निर्धार
निर्धार = निश्चय
निर्मळ = स्वच्छ
नियम = पद्धत
निष्ठा = श्रद्धा
नृत्य = नाच
नोकर = सेवक
परिश्रम = कष्ट, मेहनत
पती = नवरा, वर
पत्र = टपाल
पहाट = उषा
परीक्षा = कसोटी
पर्वा = चिंता, काळजी
पर्वत = डोंगर, गिरी, अचल
पक्षी = पाखरू, खग, विहंग
प्रकाश = उजेड
प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
प्रवासी = वाटसरू
प्रजा = लोक
प्रत - नक्कल
प्रदेश = प्रांत
प्रवास = यात्रा
प्राण = जीव
पान = पत्र, पत्ता
प्रासाद = वाडा
पाखरू = पक्षी
पाऊल = पाय, चरण
पाऊलवाट = पायवाट
प्रार्थना = स्तवन
प्रामाणिकपणा = इमानदारी
प्रारंभ = सुरुवात, आरंभ
प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा
प्रोत्साहन = उत्तेजन
पाऊस = वर्षा, पर्जन्य
पाणी = जल, नीर, तोय, उदक
पिशवी = थैली
पुस्तक = ग्रंथ
पुतळा = प्रतिमा, बाहुले
पुरातन = प्राचीन
पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा
फलक = फळा
फांदी शाखा
फूल = पुष्प, सुमन, कुसुम
बदल = फेरफार, कलाटणी
बर्फ = हिम
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक
बाप = पिता, वडील, जनक
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती
ब्रीद = बाणा
भरवसा = विश्वास
भरारी = झेप, उड्डाण
भव्य = टोलेजंग
भाट = स्तुतिपाठक
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा
भाळ = कपाळ
भाऊ = बंधू, सहोदर
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण
मदत = साहाय्य
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा
मानवता = माणुसकी
मान = गळा
मंगल = पवित्र
मंदिर = देऊळ, देवालय
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय
मुलगी = कन्या, तनया
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन
मुख = तोंड, चेहरा
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता
युक्ती = विचार, शक्कल
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर
योद्धा = लढवय्या
रक्त = रुधिर
रणांगण = रणभूमी, समरांगण
र्हास = हानी
राग = क्रोध, संताप, चीड
राजा = नरेश, नृप
राष्ट्र = देश
रांग = ओळ
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा
रेखीव = सुंदर, सुबक
लग्न = विवाह, परिणय
लाट = लहर
लाज = शरम,
लोभ = हाव
वस्त्र = कपडा
वारा = वात, पवन, अनि

Читать полностью…

मराठी व्याकरण

*समास*

*4) बहुर्वीही समास:*

*ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून, त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विशेषण असते, त्या सामासिक शब्दास बहुर्वीही समास म्हणतात.*

या समासाचे चार प्रकार पडतात:

*अ)विभक्ती बहुर्वीही:*

विभक्ती बहुर्वीही समासाचे दोन प्रकार पडतात.

१} *सामानाधीकरण:*

विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.

1)लक्ष्मीकांत
लक्ष्मी आहे कांता ज्याची
विष्णू (प्रथमा)

2)वक्रतुंड
वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो
गणपती (प्रथमा)

3)नीलकंठ
नील आहे कंठ ज्याचे तो
शंकर (प्रथमा)

4)भक्तप्रिया
भक्त आहे प्रिय जयला तो
देव (प्रथमा)

5)जितेंद्रिय
जीत आहेत इंद्रिय ज्याने तो
मारुती (प्रथमा)

6)लंबोदर
लांब आहे उदार ज्याचे असा तो
गणपती (प्रथमा)

7पांडुरंग
पांडूर आहे रंग ज्याचे असा तो
विठ्ठल (प्रथमा)

२ } *व्याधीकरण:*

विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.

1)सुधाकर
सुधा आहे करत असा तो (चंद्र) (प्रथमा/ सप्तमी)

2)गजानन
गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश) (षष्ठी/ प्रथमा)

3)भालचंद्र
भाळी आहे चंद्र ज्याच्या तो (शंकर) (सप्तमी/ प्रथमा)

4)चक्रपाणी
चक्र आहे पानीत असा तो ( विष्णू) (प्रथम/ सप्तमी)



*आ) नत्र बहुर्वीही समास:*

*ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि, असे नकारदर्शक असेल तर, त्यास नत्र बहुर्वीही समास म्हणतात.*

१)अव्यय
नाही व्यय ज्याला ते

२)अनंत
नाही अंत ज्याला ते

३)निर्धन
गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो

४)निरास
नाही रस ज्यात ते

५)नाक
नाही एक (दु:ख) ज्यात ते

६)अनादी
नाही आदी ज्याला तो

७)अखंड
नाही खंड ज्याला असे ते

८)अनियमित
नियमित नाही असे ते

९)अनाथ
जयला नाथ नाही असा तो

१०)अस्पृश्य
यला स्पर्श करत नाही असे ते

११)निर्बळ
निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो

१२)निर्बुद्ध
ज्याला बुद्धी नाही असा तो

१३)अकर्मक
नाही कर्म जयला असे ते

१४)नास्तिक
नाही आस्तिक असा तो

*इ) सहबहुर्वीही समास:*

*जय बहुर्वीही समासाचे पहिले पद 'सह' किंवा 'स' अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुर्वीही समास म्हणतात.*

१)सदर
आदराने सहित असा तो

२)सफल
फळाने सहित असे ते

३)सवर्ण
वर्णासहित असा तो

४)सहपरिवार
परिवारासहित असा तो

५)सबल
बलाने सहित असा तो

*ई)प्रादि बहुर्वीही समास:*

*ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दूर, वि अशा उपसर्गानी युक्त असते त्यास प्रादि बहुर्वीही समास म्हणतात.*



१)सुमंगल
पवित्र आहे असे ते

२)दुर्गुणी
गुणापासून दूर असलेला

३)प्रबळ
अधिक बलवान असा तो

४)विख्यात
विशेष ख्याती असलेला तो

५)निर्घुण
निघून गेली आहे घृणा ज्यातून तो

Читать полностью…

मराठी व्याकरण

♻संधी व त्याचे प्रकार♻

✍जोडाक्षरे:
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात.

❇उदा.
1. विधालय : धा : द + य + आ

2. पश्चिम : श्चि : श + च + इ

3. आम्ही : म्ही : म + ह + ई

4. शत्रू : त्रू : त + र + ऊ


🌀 संधी:

❇स्वरसंधी -
जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.

❇उदा.

1. ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा

2. सूर्यास्त = सूर्य + अस्त

3. सज्जन = सत् + जन

4. चिदानंद = चित् + आनंद

🌀 संधीचे प्रकार:
संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.

❇स्वर संधी -
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना
'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.

♻दिर्घत्व संधी -
1. अ + अ = आ
2. आ + आ = आ
3. आ + अ = आ
4. इ + ई = ई
5. ई + ई = ई
6. इ + इ = ई
7. उ + ऊ = ऊ
8. उ + उ = ऊ

♻नियम -
(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.

❇उदा.
ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा

गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश

उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश

चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय

महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी

देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी

(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.


❇उदा.

एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य

सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव

मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य

प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य

जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ

गंगा+औघ (आ+औ=औ)
गंगा+औ+घ= गंगौघ

(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.

❇उदा.

प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ

इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी

अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम

प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक

मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर

पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा

(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.

❇उदा.

🗒ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन

🗒गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन

🗒गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर

🗒नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक


🌀व्यंजन संधी :
एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.

उदा.
1. सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)

2. चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)

♻नियम -
(1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.

❇उदा.
विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल

वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती

क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा

(2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात.



क्रमशः

Читать полностью…

मराठी व्याकरण

♉समास व त्याचे प्रकार

💠v) कर्मधारय तत्पुरुष समास :

↪ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.

🌅उदा.    

🌓नील कमल - नील असे कमल
 
🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन
 
🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
 
🌓महादेव - महान असा देव

💠कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात.

💠अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय -

↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.

🌓महादेव - महान असा देव
 
🌓लघुपट - लहान असा पट
 
🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन

💠आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय -

↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.

🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
 
🌓मुखकमल - मुख हेच कमल
 
🌓वेशांतर - अन्य असा वेश
 
🌓भाषांतर - अन्य अशी भाषा

💠इ) विशेषण उभयपद कर्मधारय -

↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.  

🌓लालभडक - लाल भडक असा
 
🌓श्यामसुंदर - श्याम सुंदर असा
 
🌓काळाभोर - काळा भोर असा

💠ई) उपमान पूर्वपद कर्मधाराय -

↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत पूर्वपद हे उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

🌅उदा.    

🌓वज्रदेह - वज्रासारखे देह
 
🌓चंद्रमुख - चंद्रासारखे मुख
 
🌓राधेश्याम - राधेसारखा शाम
 
🌓कमलनयन - कमळासारखे नयन

💠उ) उपमान उत्तरपद कर्मधारय -

↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.

🌅उदा.  

🌓मुखचंद्र - चंद्रासारखे मुख
 
🌓नरसिंह - सिंहासारखा नर
 
🌓चरणकमल - कमलासारखे चरण
 
🌓हृदयसागर - सागरासारखे चरण

💠ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय -

↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.   

🌓सुयोग - सु (चांगला) असा योग
 
🌓सुपुत्र - सु (चांगला) असा पुत्र
 
🌓सुगंध - सु (चांगला) असा गंध

💠ए) रूपक कर्मधारय -

↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.  

🌅उदा.    

🌓विद्याधन - विद्या हेच धन
 
🌓यशोधन - यश हेच धन
 
🌓तपोबल - ताप हेच बल
 
🌓काव्यांमृत - काव्य हेच अमृत
 
▶▶▶▶▶क्रमशः ..........

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔴समास व त्याचे प्रकार

🔸काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे.
 
🔹आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो.
 
🔸बर्‍याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.
 
🔶जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच समास असे म्हणतात.
 
🔷अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

🅾उदा.

🔹वडापाव - वडाघालून तयार केलेला पाव.
 
🔹पोळपाट - पोळी करण्यासाठी लागणारे पाट
 
🔹कांदेपोहे - कांदे घालून तयार केलेले पोहे.
 
🔹पंचवटी  - पाच वडांचा समूह

🔴समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.

▶अव्ययीभाव समास
▶तत्पुरुष समास
▶व्दंव्द समास
▶बहुव्रीही समास

✍📚MPSC💺UPSC-Katta📚✍

🔶अव्ययीभाव समास :

🔹ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारख केला जातो त्यास अव्ययीभवन समास असे म्हणतात.
 
🔸अव्ययीभाव समासात आपल्याला खलील भाषेतील उदाहरणे पाहावयास मिळतात.

🔴मराठी भाषेतील शब्द -

🅾उदा.    

▶गोवोगाव - प्रत्येक गावात
▶गल्लोगल्ली -  प्रत्येक गल्लीत
▶दारोदारी -  प्रत्येक दारी
▶घरोघरी -  प्रत्येक घरी

🔴संस्कृत भाषेतील शब्द -

🅾उदा.  

🔹प्रती (प्रत्येक) - प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन

🔹आ (पर्यत) - आमरण

🔹आ (पासून) - आजन्म, आजीवन
 
🔹यथा (प्रमाण) - यथाविधी, यथामती, यथाशक्ती.

 🔴अरबी व फारसी भाषेतील शब्द -

🅾उदा.    

🔹दर (प्रत्येक) - दारसाल, दरडोई, दरमजल.
 
🔹गैर (प्रत्येक) - गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त
 
🔹हर (प्रत्येक) - हररोज, हरहमेशा
 
🔹बे (विरुद्ध) - बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक

➡➡➡➡क्रमशः ........

Читать полностью…

मराठी व्याकरण

महत्वपूर्ण यादी....खास आपल्या ग्रुपसाठी
✒✒✒✒✒✒✒
टोपणनावाने लिहिणारे मराठी साहित्यिक, गद्यलेखक, कवी
जुन्या अन् नव्या कालखंडातील काही नामवंत... 4G पर्यंतची मराठी वाङमयीन झेप...
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

📓अकिंचन
वासू. ग. मेहेंदळे

📔अनंततनय
दत्तात्रेय अनंत आपटे

📔अनंतफंदी
अनंत भवानीबावा घोलप

📙अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा
विठ्ठल अनंत पिंपळगावकर

📔अनिल
आत्माराम रावजी देशपांडे

📔अनिल भारती
शान्ताराम पाटील

📒अशोक (कवी)
नारायण रामचंद्र मोरे

📘अज्ञातवासी
दिनकर गंगाधर केळकर

📔आधुनिक नीळकंठ
बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर

📘आनंद
विनायक लक्ष्मण बरवे

📘आनंदतनय
गोपाळ आनंदराव देशपांडे

📓इंदिरा
इंदिरा संत

📓इंदुकांत
दिनकर नानाजी शिंदे

📕उदासी/हरिहरमहाराज
नीलकंठ रामकृष्ण पाळंदे

📙उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/
उद्धव xxxx कोकिळ

📗एकनाथ, एकाजनार्दन
एकनाथ सूर्यनारायण पैठणकर

📒कलापी, बालकवी
त्र्यंबक बापूजी ठोंबरे

📓कवीश्वरबास
भानूभट/भास्करभट्ट xxxx बोरीकर

📙कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठल
विठ्ठल अनंत पिंपळगावकर

📙कांत
वा.रा. कांत

📓काव्यशेखर
भास्कर काशीनाथ चांदूरकर

📓किरात/भ्रमर
कृष्णाजी लक्ष्मण सोमण

📙कुंजविहारी
हरिहर गुरुनाथ सलगरकर

📗कुमुदबांधव
स.अ. शुक्ल

📓कुसुमाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर

📙कृष्णकेशव
अनुपलब्ध

📓कृष्णाग्रज
अनुपलब्ध

📘केशवकुमार
प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे

📒केशवसुत
कृष्णाजी केशव दामले

📘केशवसुत
नारायण केशव बेहेरे

📕के.स.रि.
केशव सदाशिव रिसबूड

📙कोणीतरी
नरहर शंकर रहाळकर

📓गिरीश
शंकर केशव कानेटकर

📙गोपिकातनया
कु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे)

📓गोपीनाथ
गोपीनाथ तळवलकर

📒गोमा गणेश
गणेश कृष्ण फाटक

📙गोविंद
गोविंद दत्तात्रय दरेकर

📘गोविंदपौत्र
श्रीधर व्यंकटेश केतकर

📓गोविंदप्रभु
गुंडम अनंतनायक राऊळ

📙गोविंदाग्रज
राम गणेश गडकरी

📓ग्रेस
माणिक सीताराम गोडघाटे

📒चक्रधर
श्रीचांगदेव राऊळ

📓चंद्रशेखर
चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे

📕चेतोहर
परशुराम नारायण पाटणकर

📗जगन्नाथ
जगन्नाथ धोंडू भांगले

📘जगन्मित्र
रेव्हरंड नारायण वामन टिळक

📗जननीजनकज
पु.पां गोखले

📓टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती
वासुदेव गणेश टेंबे

📗ढोलीबुवा/महीपतिनाथ
सखाराम केरसुण

📙दत्त
दत्तात्रय कोंडो घाटे

📓दया पवार
दगडू पवार

📕दा.ग.पा.
दामोदर गणेश पाध्ये

📔दासोपंत/ दिगंबरानुचर
दासो दिगंबर देशपांडे

📕दित्जू/माधव जूलियन
माधव त्र्यंबक पटवर्धन

📘नारायणसुत
श्रीपाद नारायण मुजुमदार

📒निरंजन
वसंत सदाशिव बल्लाळ

📓निशिगंध
रा.श्री. जोग

📓निळोबा
निळा मुकुंद पिंपळनेरकर

📙नीरजा
नीरजा साठे

📓नृसिंहसरस्वती
नरहरी माधव काळे

📘पठ्ठे बापूराव
श्रीधर कृष्ण कुलकर्णी (रेठरेकर)

📓पद्मविहारी
रघुनाथ गणेश जोशी

📔पद्मा
पद्मा गोळे

📓पी.सावळाराम
निवृत्तिनाथ रावजी पाटील

📓पुरु.शिव. रेगे
पु.शि. रेगे

📘पूर्णदास
बाबा उपसकर-राजाध्यक्ष

📒प्रभाकर शाहीर
प्रभाकर जनार्दम दातार

📙बहिणाबाई
बहिणाबाई नथूजी चौधरी

📕(संत) बहिणाबाई
कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)

📓बाबा आमटे
मुरलीधर देवीदास आमटे

📕बाबुलनाथ
विनायक श्यामराव काळे

📓बालकवी/कलापि
त्र्यंबक बापूजी ठोंबरे

📗बाळा
बाळा कारंजकर

📒बी; B
बाळकृष्ण अनंत भिडे

📙बी; BEE
नारायण मुरलीधर गुप्ते

📗बी रघुनाथ/फुलारी
भगवान रघुनाथ कुळकर्णी

📙बोधलेबुवा
माणकोजी भानजी जगताप

📓भगवानकवि
भवान रत्नाकर कर्‍हाडकर

📗भानजी
भास्कर त्रिंबक देशपांडे

📕भानुदास/मामळूभट
भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)

📓भावगुप्तपद्म
पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी

📗भावशर्मा
के.(केशव) नारायण काळे

📕भालेंदु
भालचंद्र/गुलाबराव सीताराम सुकथनकर

📒भ्रमर/किरात
कृष्णाजी लक्ष्मण सोमण

📓मंदार
एकनाथ पांडुरंग रेंदाळकर

📕मध्वमुनीश्वर
त्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध)

📒मनमोहन
गोपाळ नरहर उर्फ मनमोहन नातू

📙मनोहरबंधू
भास्कर कृष्ण उजगरे

📓महिपती
महिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर

📘महीपतिनाथ/ढोलीबुवा
सखाराम केरसुणे

📙माणिक/माणिकप्रभू
माणिक मनोहर नाईक,

📗माधव
माधव केशव काटदरे

📒माधव जूलियन,
माधव त्र्यंबक पटवर्धन

📕माधव मिलिंद
कॅ. मा.कृ. शिंदे

📗माधवसुत
दामोदर माधव कुळकर्णी

📗माधवानुज
काशीनाथ हरी मोडक

📕मीरा
मीरा तारळेकर

📓मुकुंदराय
मुकुंद गणेश मिरजकर

📓मुक्ताबाई/मुक्ताई
मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी

📔मुक्तिबोध
शरच्चंद्र माधब मुक्तिबोध

📓मुक्तेश्वर
मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल

📓मोरोपंत
मोरेश्वर रामचंद्र पराडकर

📓यशवंत
यशवंत दिनकर पेंढरकर

📓यशोधरा
यशोधरा साठे

📒योगेश
भालजी पेंढारकर

📗रंगनाथ स्वामी (निगडीकर)
रंगनाथ बोपाजी घोडके

📓रघुनाथ पंडित
रघुनाथ पंडित चंदावरकर

📙रमेश बाळ
बाळ सीताराम मर्ढेकर

📓राजहंस
यादव शंकर वावीकर

Читать полностью…

मराठी व्याकरण

6. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.
उदा.    

आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.

नियम: 7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.
उदा.    

ज्याला कर नाही त्याला डर कसली.गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.ते ध्यान पाहून मला हसू आले.देणार्या ने देत जावे.वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.   
 

 

Читать полностью…
Subscribe to a channel