🌷🌷7. मध्यमपदलोपी समास🌷🌷
ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसर्यासाठी पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात. या समासास लुप्तपद कर्मधारेय समास असेही म्हणतात.
उदा.
🌷साखरभात – साखर घालून केलेला भात
🌷पुरणपोळी – पुरण घालून केलेली पोळी
🌷कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे
🌷घोडेस्वार – घोडयावर असलेला स्वार
🌷बालमित्र – बालपणापासूनचा मित्र
🌷चुलत सासरा – नवर्यानचा चुलता या नात्याने सासरा
🌷लंगोटी मित्र – लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र
🌷🌷5. कर्मधारय तत्पुरुष समास🌷🌷
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.
उदा.
🎋नील कमल – नील असे कमल
🎋रक्तचंदन – रक्तासारखे चंदन
🎋पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
🎋महादेव – महान असा देव
🎋पीतांबर – पीत असे अंब ज्याचेपीत (पिवळे,अंबरवस्त्र)
🎋मेघशाम – मेघासारखा काळा
🎋चरणकमळ – चरण हेच कमळ
🎋खडीसाखर – खडयसारखी साखर
🎋तपोबळ – तप हेच बळ
🌷🌷3. उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष🌷🌷
ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.
उदा.
🎋ग्रंथकार – ग्रंथ करणारा
🎋शेतकरी – शेती करणारा
🎋लाचखाऊ – लाच खाणारा
🎋सुखद – सुख देणारा
🎋जलद – जल देणारा
वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.
नंतर दुसर्याद पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.
इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.
🌷🌷1. विभक्ती तत्पुरुष🌷🌷
ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.
उदा.
🌹कृष्णाश्रित – कृष्णाला आश्रित – व्दितीया – देशगत, प्रयत्नसाध्य
🌹तोंडापाठ – तोंडाने पाठ – तृतीया – गुणदोष, बुद्धिजड, भक्तिवश, द्यार्द्र, ईश्वरनिर्मित
🌹क्रीडांगण – क्रीडेसाठी अंगण – चतुर्थी – गायरान, पोळपाट, वाटखर्च, पूजाद्रव्य, बाइलवेडा
🌹ऋणमुक्त – ऋणातून मुक्त – पंचमी – सेवानिवृत्त, गर्भश्रीमंत, जातिभष्ट, चोरभय, जन्मखोड
🌹राजपुत्र – राजाचा पुत्र – षष्ठी – देवपुजा, राजवाडा, घोडदौड, धर्मवेड, आंबराई
🌹घरजावई – घरातील जावई – सप्तमी – स्वर्गवास, वनभोजन, पोटशूळ, कूपमंडूक, घरधंदा
Talathi - 2023| TCS IBPS
🔥 सर, एवढे भारी प्रश्न आपण आणता कोठून ?
Live सुरू होणार आहे....
अतिसंभाव्य प्रश्न - 6
with Sanjay Pahade Sir
#tcs #ibps #talathi #maths #reasoning
📲 Link :
https://youtube.com/live/gwtkCSKlnJY
https://youtube.com/live/gwtkCSKlnJY
17 July at 7 pm
🔴🔴
🌺स्वभावोक्ती –एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो तेव्हा ‘स्वभावोक्ती’ अलंकार होतो.
उदा.
🌷मातीत ते पसरले अति रम्य पंख |
केले वरी उदर पांडुर निष्कलंक ||
चंचू तशीच उघडी पद लांबविले |
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ||
🌺अतिशयोक्ती -कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो.
उदा.
🌷दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला ||
🌺उत्प्रेक्षा –उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.
🌷विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही
🌷तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||
🌷🌷अर्थालंकार :🌷🌷
👉दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते. तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्वाच्या असतात.
👉ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात ‘उपमेय’ असे म्हणतात. ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून ‘मुख’ हे ‘उपमेय’ आहे.
👉उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून ‘कमल’ हे तेथे ‘उपमान’ आहे.
👉उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला ‘साधर्म्य’ किंवा ‘समान धर्म’ असे म्हणतात. वाक्यात उपमेय ‘मुख’ आणि उपमान ‘कमळ’ यांमध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे.
👉उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला ‘साधर्म्यसूचक शब्द’ किंवा ‘साम्यसूचक शब्द’ म्हणतात.
👉वरील वाक्यात ‘कामलासारखे मुख’ यातील ‘सारखे’ हा ‘साधर्म्यसूचक’ शब्द आहे.
🌹यमक - शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यांत ‘यमक’ हा अलंकार महत्वाचा आहे. एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो.
उदा.
मना चंदनाचे परी त्वा झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||
या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |
अशा शब्दांनी नादमाधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितांतून निवडून काढा.
*चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कृषी सेवकची 2070 पदांची जाहिरात धडकण्याची शक्यता आहे.
फॉलो करा @jobkatta
6🌷🌷. व्दिगू समास🌷🌷
ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात. या समासास संख्यापूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात.
उदा.
🎋नवरात्र – नऊ रात्रींचा समूह
🎋पंचवटी – पाच वडांचासमूह
🎋चातुर्मास – चार मासांचा समूह
🎋त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह
🎋त्रैलोक्य – तीन लोकांचा समूह
🎋सप्ताह – सात दिवसांचा समूह
🎋चौघडी – चार घडयांचा समुह
🌷🌷4. नत्र तत्पुरुष समास🌷🌷
ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात. म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)
उदा.
🌷अयोग्य – योग्य नसलेला
🌷अज्ञान – ज्ञान नसलेला
🌷अहिंसा – हिंसा नसलेला
🌷निरोगी – रोग नसलेला
🌷🌷2. अलुक तत्पुरुष🌷🌷
ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा.
🌹तोंडी लावणे
🌹पाठी घालणे
🌹अग्रेसर
🌹कर्तरीप्रयोग
🌹कर्मणी प्रयोग
MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr
Читать полностью…🌺विरोधाभास –एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो. तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.
उदा.
🌷जरी आंधळी मी तुला पाहते.
🌷मरणात खरोखर जग जगते ||
🌺दृष्टान्त –एखादे तत्त्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.
उदा.
🌷लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||
तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात ते कशासाठी हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते आणि ऐश्वर्यसंप ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो अशी उदाहरणे देतात.
🌺व्यतिरेक –या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
उदा.
🌷अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा
🌷तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा
🌷🌷प्रकार -🌷🌷
🌺उपमा – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.
🌷लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्या वर वहावे ||
🌺श्लेष - एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा ‘श्लेष’ हा अलंकार होतो.
उदा.
🌷मित्राच्या उद्याने कोणास आनंद होत नाही. (मित्र = सखा, मित्र = सूय)
🌷श्रीकृष्ण नवरा मी नवरी |
शिशुपाल नवरा मी न-वरी ||
🌷🌷शब्दालंकार :🌷🌷
जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारीत अलंकारांना ‘शब्दालंकार’ म्हणतात.
👉प्रकार-
🌹अनुप्रास – कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
( गडद गडद जलदची पुनरावृत्ती)