महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम
महिला व बालविकास आयुक्तालयामधील (1)बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी),
(2)सहायक आयुक्त,
(3)परिविक्षा अधीक्षक,
(4)जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,
(5)जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास), जिल्हा परिषद
वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत.
▪️शैक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
▪️वयोमर्यादा:- किमान 19 व कमाल 38 वर्षे
▪️प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
▪️ राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.
एमपीएससीच्या 2019 मधील उत्तीर्ण 413 विद्यार्थ्यांची नियुक्ती, 17 जानेवारीपासून होणार प्रशिक्षणाला सुरुवात
Читать полностью…👆MPSC Time-Table 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
दिवाळी पहाट......
राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आजपासूनच अभ्यासाला लागा. एक महिना पुरेसा आहे या परीक्षेच्या अभ्यासाला. कारण मागील वर्षभर तुम्ही तेच तेच वाचत आला आहात. आता तो अभ्यास फक्त रिव्हिजन करुन घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त सराव करुन आपला आत्मविश्वास उंचवायचा आहे.
परीक्षा काय दरवर्षी येतात, जशी दिवाळी येते. पण आपले काय? आपण आहे तिथेच राहतो. मागील वर्षी उरलेले फटाके यावर्षी फोडतो. कधीपर्यंत असेच चालणार आहे? जर ही परिस्थिती बदलायची असेल तर थोडे लक्ष देऊन अभ्यासाला लागा.
जसे आपल्या यशाला फक्त आपणच जबाबदार असतो, तसेच आपल्या अपयशाला केवळ आपणच जबाबदार असले पाहिजे. परीक्षेनंतर आपल्या अपयशाचे खापर आयोगावर फोडण्याचा शिरस्ता बदलायला हवा ना आता.
नीट नियोजन करा,उरले सुरलेले फटाके आज फोडून घ्या.फराळातील आवडते पदार्थ फस्त करुन जोमाने अभ्यासाला लागा.
आता हिवाळाही मस्त कडक असणार आहे.थंडीत चांगला अभ्यास होतो.या गृहितकाचा अनुभव घेऊन पहा. नाहीतर आहेच आपले नेहमीची येतो पावसाळा. पुन्हा परीक्षा,पुन्हा आपण!
*मौका - मौका*
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता.
कहीं ज़मीन तो कहीं आसमाँ नहीं मिलता.
आपल्यापैकी अनेकांनी ही गझल ऐकली असेल. कधीकाळी मलाही ही गझल माझ्याही खूप जवळची होती. पण आज ज्या ज्या क्षेत्रात मी काम करत आहे, तिथे अशा निराशावादी भावनेला अजिबात स्थान नाही. बस्स मला जिंकायचे आहे हा एकमेव ध्यास लागलेला असतो. अर्थातच फक्त बोलून काही होत नाही यासाठी प्रयत्नही करावे लागतात. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात तर काही गोष्टी ज्यात आपण मास्टर्स असतो त्यांना सतत धार लावावी लागते.
मित्रांनो, विषयांतर न करता मूळ मुद्दा असा आहे की, राज्यसेवा २०२१ची जाहिरात आपण सगळ्यांनी पाहिली आहे. प्रशासनात गेल्या ५ वर्षापासून कमी वयात सर्व्हिसला लागलेले विद्यार्थी कौटुंबिक किंवा इतर काही कारणांमुळे जे काम सध्या करत आहे त्यातच खूश आहे. विशेषत: गृप D ते गृप B पदावर काम करत असलेले विद्यार्थी. आपल्या सर्वांना मनातून कुठेतरी वाटत असते काश! एक मौका मिला होता तो आज क्लास १ होते. पण आपण संधीची वाट पाहत गेली ५/६ वर्षे गमावली आहेत.
आपण मागील काही वर्षात ज्या संधीची वाट पाहत आहात ती ही एकमेव व शेवटची संधी आहे. या जाहिरातीत क्लास १चा जागा भरपूर आहेत. लक्षात घ्या २०२२ ला आयोगाचा २०१२मध्ये बदललेल्या अभ्यासक्रमास १० वर्षे पूर्ण होत आहे. म्हणजेच पुढील परीक्षेत अभ्यासक्रमात अनेक बदल घडू शकतात. आणि तो बदल अभ्यासात गॅप पडलेल्या विद्यार्थ्यांना सहन होईलच असे नाही. तेव्हा हीच ती सुवर्णसंधी आहे जिचे सोने करता येण्यासारखे आहे.
आयुष्य कुढत जगण्यापेक्षा स्वत:ला एक संधी द्यायला काहीही हरकत नाही. आपल्या मुलांना दुसऱ्यांची उदाहरणे देण्यापेक्षा आपली स्वत:चीच स्टोरी अधिक प्रेरणा देईल यात काही शंका नाही.
नक्कीच हा निर्णय थोडा सामाजिक जबाबदारी झटकण्यासारखा आहे. आपल्यातील अनेकांना आजही नोकरीसाठी दर दर की ठोकरे खावी लागत आहे. अशावेळी आपण अजून एक चान्स घेत प्रयत्न करायचा म्हणजे त्यांच्या जागा अडविण्यासारख्या आहे. पण मित्रांनो इथे डार्विनचा सिध्दांत लागू होतो. “It is not the strongest of the species that survive, or the most intelligent, but the one most responsive to change.”
"पहिले स्वत: मजबूत बना मग इतरांना घडविण्यासाठी स्वत:पेक्षा जास्त प्रयत्न करा." हे वाक्य ज्यांना पटत असेल त्यांनाच ही परीक्षा देण्याचा नैतिक अधिकार आहे. इतरांनी तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान' समाधानी रहावे. उगाचच स्वत:वर आणि जगावर उपकार करण्याच्या दुनियादारीत पडू नये.
If you want a happy ending, that depends, of course, on where you stop your story.
- दीपक गायकवाड
आदित्य अकॅडमी
संपर्क:- 9763600585
राज्यसेवा मुख्यपरीक्षा जशी जवळ येत आहे तसे विद्यार्थ्यांचे टेंशन वाढत आहे. पण याबाबत कोणी बोलत नाही. मी फोन केला तर सांगतात सर ही अडचण आहे, या विषयात प्रॉब्लेम येत आहे. नोट्स मिळत नाही आहे. निबंधाचे काय करावे काही कळत नाही.
मित्रांनो, ही ती वेळ आहे ज्यात तुम्ही या सर्व अडचणींवर मात करु शकतात परीक्षा झाल्यानंतर काहीही करता येत नाही. तेव्हा बोला किंवा सांगा. शांत बसू नका.
अनेक विद्यार्थी इथे तुम्हांला मदत करण्याऱ्यासाठी उपलब्ध आहेत. वेळीच मदत घ्या. काहीही लागले तर कळवा.
जाहिरात क्रमांक 106/2021
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येमधील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्रक
*मिशन PMO*
(प्री,मेन्स & ओरल इंटरव्ह्यू)
*टारगेट २०२१*
राज्यसेवा प्री:- २५०+
राज्यसेवा मेन्स:- ४५०+
संयुक्त पूर्व परीक्षा:- ६५+
संयुक्त मुख्य परीक्षा:- १३५+
लिपिक टंकलेखक:-६०+
वनसेवा+कृषीसेवा ५५+
AMVI RTO:- ४०+
Dept PSI:- ५०+
इतर पूर्व परीक्षा ५५+
- अंदाजे असे टारगेट ठेवत अभ्यासाचे नियोजन करा.
- लक्षात घ्या हा स्कोअर कमी जास्तही होवू शकतो २०२१च्या परीक्षांमध्ये.
- पण म्हणतात ना, Not Failure, but low Aim, is Crime या उक्तीप्रमाणे अभ्यासाला लागा.
- क्यूंकी,बडा है तो बेहतर है.
Join»»» @aditya2050 »»»
»»» आदित्य अॅकॅडमी »»»
Forest 2019 Result
Group A
1) Vivek Shinde
2) Prakash Awadhutwar
Group B
1) Vikesh Thakare
2) Gajanan Pawar
3) Shubham Patil
4) Anjana Bansode
वरील उमेदवारांची नावे फक्त MFD-2019 या एकमेव गृपमधील आहेत.तसेच ज्यांची पूर्ण नावे टेलिग्राम वर दिसत आहे अशीच नावे इथे आहेत. बाकी विद्यार्थ्यांनी आपली टोपणनावे टेलिग्रामवर दिली आहेत. त्यामुळे काहींची नावे यात पास होऊनही दिलेली नाहीत.
पुन्हा एकदा सर्व उमेदवार आणि या परीक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या आपल्या अधिकारी व मार्गदर्शक मित्रांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!
*MPSC वेळापत्रक*
*अंदाजित वेळापत्रक*
कोणती परीक्षा कोणत्या महिन्यात होऊ शकते. याचा एक अंदाज पाहण्यासाठी खालील पोस्ट पहा....
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10215676447783808&id=1820560616
उद्या होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) २०२०साठी आदित्य अकॅडमीतर्फे सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा..!
परीक्षेची भिती वाटत असल्यास फोन करु शकतात.
जीने के बहाने लाखो है!
मित्रांनो,
वेळीच भानावर या.आपले मरण इतके स्वस्त नाही. शेवटचा मार्ग निवडण्यापेक्षा इतर मार्गांकडेही लक्ष द्या. MPSC म्हणजेच सर्वस्व नाही.
‘मरू का, मरू का?,’ असं म्हणणाऱ्या विषयी मला कधीच कौतुक वाटत नाही. उलट, ‘मी जगून दाखवतोच, जगणं मुठीत पकडतोच,’ अशांचा मला भारी अभिमान वाटत असतो.
निसर्ग आयुष्य देतं, जन्म देतं; पण चालण्यासाठीच्या वाटा आपल्यालाच तयार कराव्या लागतात. आपल्या वाटेवर घुबडं का जमा होतात, हे आपल्यालाच शोधावं लागतं.
असेही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला इथली व्यवस्था काडीचीही किंमत देत नाही.विषाणू आणि मृत्यूचे आकडे आता पूर्वीसारखे परिणाम करत नाही की घाबरवितही नाही.
व्यवस्थेने आपले अस्तिस्तच नाकारले आहे तेव्हा आपण जिवंत असलो काय अन मेलो काय इथे कुणाला फरक पडतो? मुर्दाड सरकार असो की टीआरपीसाठी वाट्टेल त्या थराला जाणारी मिडिया आपल्या मृत्यूचेही भांडवल करु शकत नाही.आपण ना तर कोरोनाने मरत आहात ना की ही शेतकरी आत्महत्या आहे.ज्यांना मृत्यूनंतर तरी कोणी विचारतं,काही पॅकेज जाहिर होतं,मदतनिधी मिळतो.पण आपले काय? दोन दिवस चर्चा नंतर दुसऱ्याचा नंबर लागल्यावर अरे तो पण असाच गेला होता ना? एवढीच काय ती आठवण!
तेव्हा वेळीच भानावर या. जीने के बहाने लाखो है!
MPSC Joining च्या निमित्ताने....
You are a winner, you are a battler, never ever give up in life.
'When you get in a tight place and everything goes against you, till it seems as though you could not hold on a minute longer, Never Give up then, for that is just the place and time that the tide will turn.!!"
न्यूटनबाबांचा एक नियम नेहमी लक्षात ठेवा,तुम्हांला जितके जास्त दाबण्याचा,दडपण्याचा प्रयत्न केला जाईल,तितक्याच वेगाने तुम्ही जोरदार मुसंडी मारत आणि उसळत वर याल.
Just remember, you are not alone, in fact you are in a very common place with millions of others. We need to help each other and keep striving to reach our goals.
सत्यमेव जयते!!!
👆महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण ९००पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ची जाहिरात
Читать полностью…Forest Mains Result
ACF
Vivek Shinde
Prakash Awdhutwar
RFO
Vikesh Thakare
Prashant Khairnar
Gajanan Pawar
Shubham Patil
Anjana Bansode
ज्यांची नावे आपल्या टेलिग्राम गृपमध्ये पूर्ण दिसत आहे (नाव आणि आडनाव) फक्त अशा विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे.बाकी विद्यार्थ्यांनी टोपणनावाने प्रोफाईल बनविली असल्यामुळे संपूर्ण नाव दिसत नाही आहे.त्यामुळे उत्तीर्ण असूनही काही विद्यार्थ्यांची नावे यात नसण्याची दाट शक्यता आहे.
*सोडता यायला हवं!*
*A stop loss is meant to protect You, from Yourself!*
गोष्ट किती ही जवळची, मौल्यवान असू.तिचं आपलंच असणं हा आपला अट्टाहास आपल्यालाच त्रास देतो.
प्रत्येकाचा काळ ठरलेला असतो, थांबत काहीच काही, कधीच.काळाला थांबवून ठेवण्यासाठी आपण खूप काही प्रयत्न करतो,आपली ऊर्जा खर्च करतो. आणि पदरी पडते ती निराशाच. त्यापेक्षा तिथल्या गोष्टी तिथंच सोडून दिल्या तर जरा बरं नाही का होणार?
आपल्या आजूबाजूला खूप काही असतं,आहे.त्या गोष्टींना स्वीकारून तिथे ही आनंद दडलेला आहेच. ते न बघता आपण मात्र नसलेल्या गोष्टींच्या मागे धावतो.
आणि खरं तर आनंद मानण्यात असतो, मग तो सगळीकडे सारखाच पसरलेला आहे. आपणच आपली दृष्टी,विचार संकुचित करून बसलेलो असतो.
कुणी व्यक्ती,वस्तू आज आहे,उद्या नसू शकते आणि नसणारच असते.पण आपण मात्र गुंतून बसतो त्याच्यात, मग बाहेर येणं आपल्याला जमत नाही.ज्याला आनंदी राहायचंय त्याने कशात गुंतू नये असं म्हणतात ते काय उगाच नाही.
किती ही मोठं संकट आलं तरी शांतपणे त्यातून बाजूला पडता यायला हवं. तेवढं आपल्या मनाला आपण लवचिक करायला हवं. आपल्याच साठी...
मग कोणती गोष्ट आपल्याकडं असू नसू फरक नको पडायला.परिस्थितीनुसार काही गोष्टी तेवढ्याच सहजतेने सोडता यायला हव्यात.
पान गळतीवर झाडं कधी तक्रार करत नाही,ते नव्या पालवीसाठी लगेच तयार होतात.असंच काहीसं आपण आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टींना तयार राहायला शिकलं पाहिजे.
- राजश्री कुलकर्णी
*Always set and stick to "The Stop Loss"!*
*Once the stop loss triggers, just book the minimal loss and exit. Never be too hopeful!*
काल विराटने RCB चे कर्णधारपद सोडले का सोडले हे सांगायची आवश्यकता नाही. आपण आयुष्य Predict करु शकत नाही. आयुष्याचा ग्राफ आपल्या मर्जीप्रमाणे खाली वर होत नाही. तो कायम आपल्या मर्जीप्रमाणेच वागतो. त्याचा कल वेळीच समजणे गरजेचे आहे. अट्टाहास करुन आपण गोष्टी मिळवू शकत नाही. यासाठी सर्व काही जुळून यायला हवं! हो प्रयत्नाने या गोष्टीवरही मात करता येते पण कुठे थांबायचे हे सुध्दा कळायला हवं!
फक्त ४ रन केले असते तर सर डॉन ब्रॅडमनने १००ची सरासरी गाठली असती पण शेवटच्या कसोटीत ते शून्यावर बाद झाले. तेच आपला दादा सौरव गांगुलीचे! क्रिकेटची पंढरी लॉर्ड्समध्ये पहिल्याच कसोटीत शतक झळकावून त्याने इतिहास रचला.पण आपल्या शेवटच्या कसोटीच्या अखेरच्या डावात तो सुध्दा शून्यावर बाद झाला. हे नकोसे विक्रम त्यांना बदलणे अवघड नव्हते पण ते ते तिथेच थांबले.
*जीवन नेहमी अपूर्ण असतं आणि तसं ते असण्यातच त्याची गोडी सामावलेली आहे.*
*- वि.स.खांडेकर*
स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Читать полностью…*राज्यसेवा आत्मपरीक्षण २०२१*
कृपया खालील माहिती ही फक्त माझ्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांच्याशी माझा मोबाईल किंवा गृपद्वारे प्रत्यक्ष संपर्क होत आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे. इतरांनी याकडे दुर्लक्ष करावे.ही विनंती!
अपेक्षेप्रमाणे राज्यसेवा २०२१ची जाहिरात आली आहे. जागाही चांगल्या आहेत. अनेक चर्चांना आता ऊत येणार आहे. पण आपण आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. आपला अभ्यास पुढे यावरच ठरणार आहे. मागील काही वर्षात आपल्याला अपयश का आले हे शोधावे लागणार आहे. माझ्याकडून नेमक्या काय चुका झाल्यात की ज्यामुळे आज माझ्याकडे राज्यसेवेचे पद नाही किंवा मला अपेक्षित असलेले आवडते पद नाही हे येत्या २/३ दिवसात शोधावे लागणार आहे. यानंतरच अभ्यास सुरु करावा.
एक कागद घेऊन त्याला मधोमध दुमडा जसे आपण Origami करतांना करतो. दोन भाग होतील. एकीकडे
*१) आतापर्यंत मी काय केले?* व दुसरीकडे *२) मी काय करायला हवे होते?* किंवा माझ्याकडून अभ्यास करतांना काय राहून गेले? हे लिहून काढायचे आहे. अगदी प्रामाणिकपणे. म्हणजे किती कप चहा प्यायला हवा होता आणि किती कप टाळता येण्यासारखे होते इतपर्यंत. यातून काही गोष्टी होतील.
१) मी आतापर्यंत काय केले? हे कळेल.
२) मी आतापर्यंत काय करु शकलो असतो? हे कळेल.
३) मी आतापर्यंत काय केले नाही? हे कळेल.
४) मी आतापर्यंत जे केले नाही त्यासाठी काय करता येईल? हे कळेल.
आता पुन्हा याच कागदावर एक
*समांतर* आडवी रेषा मारायची आहे. पुन्हा दोन भाग पडतील. एकीकडे आतापर्यंत मी काय केले? या भागात मला काय कळाले हे लिहा व दुसऱ्या मी काय करायला हवे होते? या भागात मला जे कळाले नाही पण आता वळाले आहे ते लिहून काढा.
बस यावर्षी एवढे जरी केले तरी पुरेसे आहे. तुमचे मार्क्स यावर्षी वाढले नाही तर मग बोला.
दीपक गायकवाड
आदित्य अकॅडमी
अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ
संपर्क:- 9763600585
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
Читать полностью…राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या पद/संवर्गामध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील सहायक कामगार आयुक्त, गट- अ व सरकारी कामगार अधिकारी, गट-ब या नवीन पद/संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. सदर पदे व इतर काल सुसंगत बदलासह राज्यसेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Читать полностью…अभ्यासक्रम नियोजन टप्पे:-
५०:३०:२० नियम
१) ५०% भाग जो पूर्व आणि मुख्य परीक्षेला आहे तो आधी पूर्ण करा.
२) ३०% भाग जो फक्त मुख्य परीक्षेला आहे तो पूर्ण करा.
३) २०% भाग जो फक्त लेखी परीक्षेला आहे तो पूर्ण करा.
८०:२० आणि ९०:१० नियम टेलिग्राम गृपवर अगोदरच दिलेले आहे.
सध्या अफगाणिस्तान आणि तालिबान बाबत अनेक फॉरवर्ड पोस्ट लोक विनाकारण शेअर करत असतात. याबाबत त्यांना खरच काही माहिती असते का? हा प्रश्न बिनकामाचा आहे!
आपल्याला त्यांना अभ्यासण्यासाठी खालील पुस्तके सुचविता येतील.
(१) निळू दामले यांची पुस्तके:-
१) अवघड अफगाणिस्तान
२) पुन्हा एकदा अफगाणिस्तान
३) जैरुसलेम
४) लंडन बाॅम्बिंग
५) पाकिस्तानची घसरण
६) धर्मवादळ
७) ओसामा: त्याचा धर्म, कायदा
(२) अफगाण डायरी काल आणि आज:- प्रतिभा रानडे
(३) :- गिरीष कुबेर
(४) जिहाद :- लक्ष्मीकांत देशमुख
(५) अफगाणिस्तानचा वांशिक इतिहास/तालिबान:- रंगा दाते
(६) अफगाणिस्तानातील तालिबानचा पराभव:- ज.द. जोगळेकर
(७) लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान:- मुजफ्फर हुसैन
(८) युध्दखोर अमेरिका:- अतुल कहाते
(९) अपर्णा वेलणकर यांची पुस्तके:- (मूळ लेखिका:- डेबोरा एलिस)
१) ब्रेडविनर
२) परवाना
३) शौझिया
(१०) निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा:- विभावरी बिडवे
(११) मॅन हंट :- पिटर बर्ग
मराठी अनुवाद:- रवी आमले
(१२) वावटल पेराल तर वादळच उगवेल:- मिशाएल ल्युडर्स (अनुवाद:- वैशाली करमकर)
(१३) पॉपी:- ग्रेगॉर सेमन (अनुवाद:- डॉ.प्रमोद जोगळेकर)
(१४) १) मलाला:- ऋतुजा बापट-काणे
२) मी मलाला:- सुप्रिया वकील
(१५) काबूल कंदाहारकडील कथा:- प्रतिभा रानडे
(16) Ghost Wars by Coll Steve
(17) Khaled Hosseini Books:-
A) The Kite Runner
B) A Thousand Splendid Suns
(१८) बारा जुलै ते अकरा जुलै:- फिरोज रानडे
(१९) जागतिक जिहाद आणि अमेरिका:- ताज हाश्मी
(२०) तालिबान... अफगाणिस्तान आणि शेवट नसलेले युध्द:- मलालाई जोया (अनुवाद:- भगवान दातार)
(२१) अफगाण रोजनिशी:- जे. एन. दातार
(२२) अल काईदा ते तालिबान:- सईद सलीम शाहजाद (अनुवाद:- अरविंद गोखले)
(२३) मीना अफगाण मुक्तीचा आक्रोश:- अनुवाद:- शोभा चित्रे आणि दिलिप चित्रे
(२४) तालिबान:- अहमद रशिद (अनुवाद:- भारती पांडे)
(२५) माझे तालिबानी दिवस:- अनुवाद:- डॉ. प्रमोद जोगळेकर
(२६) द तालिबान क्रिकेट क्लब:- अमृता दुर्वे
संकलन:- दीपक गायकवाड
- आदित्य अकॅडमी
- बोधिवृक्ष फाऊंडेशन
अखेर महाराष्ट्र शासनातर्फे आपल्या फाऊंडेशनच्या कामांची दखल घेण्यात आली आहे........
https://www.facebook.com/112584590652152/posts/297000395543903/?sfnsn=wiwspmo